MNS Chief Raj Thackeray | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Chief Raj Thackeray | गेल्या दोन दिवसांपुर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी दिली होती. ही धमकी पत्राद्वारे दिली होती. यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर (MNS Leader Bala Nandgaonkar) यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांची भेट घेत धमकीचं पत्र मिळाल्याची माहिती दिली होती. यानंतर आता ठाकरे सरकारने (Thackeray Government) सुरक्षा वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

 

सरकारच्या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (MNS Chief Raj Thackeray) आधीच वाय प्लस दर्जाची (Y Plus) सुरक्षा आहे. राज्य सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवली आहे. केवळ पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. एक अतिरिक्त पोलीस अधिकारी (Additional Police Officers) आणि अंमलदार राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत.

 

दरम्यान, मला एक धमकीचं पत्र आलं आहे. भोंग्याचा विषय समोर आल्यापासून अशा प्रकारच्या धमक्या मिळत आहेत.
पत्रात माझ्यासोबत राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
मी राज ठाकरेंना पत्र दाखवलं आणि पोलीस आयुक्तांना भेटलो, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं होतं.
दरम्यान, “अजानबाबात जे करत आहात ते बंद करा, अन्यथा तुम्हाला ठार करु. तुम्हाला तर सोडणार नाहीच पण राज ठाकरेंनाही मारुन टाकू, असं लिखीत पत्र होतं.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | maharashtra government increases security of mns raj thackeray after life threat

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा