MNS Chief Raj Thackeray | शेतकर्‍यांची दिवाळी आनंदात साजरी करा, राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Chief Raj Thackeray | परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकर्‍यांच्या (Rain in Maharashtra) अतोनात नुकसान झाले असून शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) अद्याप कोणतीही ठोस मदत जाहीर केलेली नाही. दिवाळीचा सण (Diwali Festival) जवळ आलेला असताना आर्थिक संकटात सापडलेला राज्यातील शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे. या स्थितीची गंभीर दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी घेतली आहे.

 

राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. कालच विधानसभेचे (Legislative Assembly) विरोधी पक्षनेते (Opposition Leader) अजित पवार (Ajit Pawar) यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेवून ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करण्याची मागणी केली होती.

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, यावर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. या परतीच्या पावसाने खरीप पीकांचे (Kharif Crop) अपरिमित नुकसान केले आहे आणि एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहेत. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्यामुळे शेतकर्‍याच्या डोळ्यांदेखत पीक वाया गेले.

 

सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत हे चांगलेच आहे, पण तेवढे पुरेसे नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की, शेतकर्‍यांचे राज्यभर झालेले नुकसान इतके मोठे आहे की राज्य सरकारने ’ओला दुष्काळ’ जाहीर करावा.

सरकारने पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत,
पण पूर्वानुभव असा आहे की सरकार पंचनाम्याचे आदेश देते पण प्रशासकीय पातळीवर पंचनामे नीट होत नाहीत.
परिणामी गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो.
त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील हे पहावे आणि परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा.

 

कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठी शेतकर्‍यांना जी प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते ती पुरेशी नाही तिचा देखील पुनर्विचार करावा.
दिवाळी हा आनंदाचा सण म्हणून खरंतर लॉकडाऊनच्या संकटकाळानंतर शेतकरी ही दिवाळी धूमधडाक्यात करण्याच्या मनस्थितीत असणार,
अशा वेळी त्यांना दिलासा देऊन त्याची दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल
याकडे राज्य सरकारने कटाक्षाने लक्ष द्यावे ही नम्र विनंती, राज ठाकरे यांनी नमूद केले आहे.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | mns chief raj thackeray letter to cm eknath shinde demand announce weight drought in maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Supriya Sule | पुण्यात वाहतूक कोंडीत अडकल्या सुप्रिया सुळे, गाडीतून उतरत त्यांनी… (व्हिडिओ)

Uddhav Thackeray | यवतमाळचे संजय देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश करताच, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

Pune Crime | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA ची मोठी कारवाई, भेसळयुक्त गुजरात बर्फीचा मोठा साठा जप्त