MNS Chief Raj Thackeray | ‘सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरु, आता त्यांनी…’, महिलादिनी राज ठाकरेंनी केलं ‘हे’ आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण जगभर 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women’s Day) साजरा केला जातो. महिला दिनानिमित्त जगभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी महिला दिनानिमित्त राज्यातील महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं’ हे मनसेचं ध्येय असून त्यामध्ये महिलांचा सहभाग आणि भूमिका देखील तितकीच महत्त्वाची आहे, असं राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय लिहिलंय फेसबुक पोस्टमध्ये?

आज जागतिक महिला दिन. सर्वप्रथम तमाम स्त्रीवर्गाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. सगळ्या चौकटी मोडून, आज सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरु आहे ती थक्क करणारी आहे. आज ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील, इथल्या मुलींना उच्च शिक्षणाची, स्वतःच करिअर घडवायची प्रचंड ओढ आहे. आणि त्यासाठी त्या घरापासून लांब, इतर शहरांत किंवा परदेशांत नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने सहज स्थिरावत आहेत, आणि जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे.

 

https://www.facebook.com/photo/?fbid=756355125851393&set=a.535839724569602

 

100-150 वर्षांपूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा (Women’s Education) अधिकार मिळावा म्हणून प्रचंड संघर्ष करावा लागत होता अशी परिस्थिती होती. आणि त्याच समाजात मोठमोठ्या उद्योगसमूहांच्या व्यवस्थापनापासून ते जागतिक अर्थकारणात (Global Economy) उलाढाली करणाऱ्या संस्थांमध्ये मोठ्या पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत. इतकंच काय देशाची अर्थव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, सीमांचं संरक्षण ते थेट राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. आणि हे सर्व त्यांनी निव्वळ स्वकर्तृत्वावर कमावलं आहे.

म्हणूनच आता स्त्रियांनी आता राजकारणात देखील मोठ्या प्रमाणावर यायला हवं.
‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं’ हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय आहे,
आणि हे साध्य करायचं असेल तर स्त्रियांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे, ह्याची आम्हाला जाणीव आहे.
म्हणूनच विविध क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं,
त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे.
पुन्हा एकदा सर्व महिलांना, जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असं राज ठाकरे
(MNS Chief Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे.

Web Title : MNS Chief Raj Thackeray | mns raj thackeray facebook post over international womens day 2023

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | उद्धव ठाकरेंच्या सभेला तुम्ही गर्दी जमवली का? अजित पवारांचं मिश्किल उत्तर म्हणाले-‘आमचाच माजी आमदार फुटला, आम्ही कशाला…’

Pune News | मित्रांसोबत धुलिवंदन खेळून रंग धुण्यासाठी नदीवर गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू, मावळातील घटना

Gadchiroli Crime News | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या भावावर FIR, जाणून घ्या प्रकरण