MNS Chief Raj Thackeray | ‘…तर गालावर वळ उठतील हे निश्चित’, मुलुंड प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा; सरकारलाही धरले धारेवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Chief Raj Thackeray | मराठी म्हणून एका महिलेला मुंबईत घर नाकारण्यात आल्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मुलुंडमधील घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पीडित महिलेने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सोशल मीडियावरून व्हिडिओ शेअर करुन सांगितला. या प्रकारानंतर संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची दखल घेत मनसेनं महिलेला विरोध करणाऱ्या पिता पुत्रांना समज दिला होता. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी सरकारला (State Government) इशारा दिला आहे.

काय आहे प्रकरण?

मुलुंडच्या गुजरातीबहुल सोसायटीत एका मराठी महिलेला ऑफिस खरेदी करायचे होते. मात्र मराठी म्हणून जागा नाकारल्यानंतर त्या तरुणीने व्हिडीओ शेअर केला. सोसायटीत मराठी माणसांना परवानगी नाही, अशी मुजोरी गुजराती व्यक्ती दाखवताना व्हिडिओत दिसला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर गुजरातींना नमते घ्यावे लागले तसंच त्यांना महिलेची माफीही मागायला भाग पाडलं. तसेच या प्रकरणी महिला आयोगानेही दखल घेतली आणि त्यानंतर या सोसायटीतील विरोध करणाऱ्या नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता या प्रकरणावर मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी ट्विट करुन इशारा देताना सरकारला धारेवर धरलं आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत.

https://x.com/RajThackeray/status/1707637885846135220?s=20

त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला.
हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील
हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे.

काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन.
तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झाला तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते.
हे असंच सुरु राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे !, अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar On Chandrashekhar Bawankule | ‘जे अशी भूमिका घेतात, त्यांच्याबद्दल…’, बावनकुळेंच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया