MNS Chief Raj Thackeray | ‘सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपले, त्यामुळे…’, पुण्यातील घटनेवरुन राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील मध्यवस्थितील सदाशिव पेठेत पेरुगेट पोलीस चौकीजवळ (Perugate Police Chowki) तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना (Assault On Girl In Sadashiv Peth Pune) मंगळवारी सकाळी घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे पुणे शहरात (Pune Crime News) खळबळ उडाली आहे. त्यावेळी दोन तरुणांनी धाडस दाखवून तरुणीचे प्राण वाचवले. मात्र, या घटनेवरुन पुण्यात महिला सुरक्षीत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुण्यातील घटनेवरुन राजकीय नेत्यांकडून राज्य सरकारवर (State Government) निशाणा साधला जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी या घटनेचा निषेध करत सरकावर हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पुण्यातील घटनेबाबत निषेध नोंदवत प्रतिक्रिया दिली. काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवले त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण ह्यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं, असं राज ठाकरे यांनी म्हटले.

दर्शना पवारच्या हत्येची (Darshana Pawar Murder Case) दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे. सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला. तसेच माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना ह्याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

Web Title :   MNS Chief Raj Thackeray | peoples eyes are sufficiently illuminated by beautification raj thackerays criticism of the government on the incident in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा