MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे कोणत्या शिवसेनेसोबत? मनसे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर दाखल; चर्चांना उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी (NCP Rebellion) झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी एकत्र यावं, अशी विनंती करणारे बॅनर्स राज्यातील अनेक शहरात लावण्यात आले. त्यामुळे राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. याच दरम्यान राज ठाकरेंचे विश्वासू अभिजित पानसे (Abhijit Panse) यांनी खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांची भेट घेतली होती. त्यामुळे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला होता.

यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. या दोन नेत्यांमध्ये काहीवेळ चर्चा झाली. ही पूर्वनियोजित भेट होती. राज ठाकरे वैयक्तिक कामासाठी आल्याचे सांगितलं जात आहे. मात्र, महाराष्ट्रातील राजकीय स्थिती अस्थिर असताना हे दोन नेते एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. दोन्ही भावांमध्ये रक्ताचं नात आहे, त्यांना एकत्र आणण्यासाठी इतर कुणाची गरज नाही, असे विधान राऊत यांनी केलं होतं. त्यामुळे आगामी काळात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र दिसतील, असं बोललं जात आहे. पण आता अचानक राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरे कोणात्या शिवसेनेसोबत आहेत? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Web Title :   MNS Chief Raj Thackeray | raj thackeray reached at varsha bungalow to meet cm eknath shinde mahrashtra political dispute

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | शरद पवारांच्या वयावरुन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र (व्हिडिओ)

Pune: Newly-married girl ends life by jumping into Indrayani river; She was being harassed to get money from her parents’ house

Neelam Gorhe join Shivsena | नीलम गोऱ्हेंचा शिवसेनेत प्रवेश, फडणवीस यांची आश्चर्यकारक उपस्थिती (व्हिडिओ)

Parag Karandikar | अभिमानास्पद ! ‘महाराष्ट्र टाइम्स’चे मुख्य संपादक पराग करंदीकर यांची ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’च्या सदस्यपदी नियुक्ती

Pooja Hegde | अभिनेत्री पुजा हेगडेच्या हॉट फोटोशुटवर नेटकरी फिदा; बॉडीकॉन ड्रेसमधील फोटो व्हायरल

Actress Madhoo | ‘रोजा’ सारखा हिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्री मधूने अचानक का सोडली इंडस्ट्री; सांगितले खरे कारण

Katrina Kaif | कतरिनाचा चाहत्यांसोबत कूल अंदाज; नेटकरी करत आहेत कौतुक