MNS Chief Raj Thackeray | आज भरती तर उद्या…, राज ठाकरेंचा भाजपला इशारा (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रत्येक पक्षाच्या इतिहासात भरती ओहोटी आलेली आहे. 65 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसची (Congress) आजची अवस्था काय आहे? त्यामुळे आज भरती आहे… उद्या ओहोटी येणार हे भाजपने (BJP) लक्षात ठेवावं, असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी दिली. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापनदिन आहे. यानिमित्त ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये मनसे कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) बोलत होते.

‘नव्या दमाने, नव्या आयुधांसह नवनिर्माणास सज्ज’ अशी टॅगलाईन घेऊन ठाण्यात मसनेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मनसैनिकांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. मनसेच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्या विभागात काय काम केलं, कोणती आंदोलनं केली आणि पक्षानं केलेली कामं यावर डिजिटल पुस्तिका देखील राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.

संदीप देशपांडेवर ज्याने हल्ला केला त्याला…

मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. माझ्या मुलाचं रक्त वाया जाऊ देणार नाही, असं सांगतानाच ज्याने हल्ला केला त्याला आधी कळेल मग सगळ्यांना कळेल, असा इशारा राज ठाकरे यांनी संबंधितांना दिला.

एक है मगर काफी है

एक ही है मगर काफी है, असा शोले चित्रपटातील संवाद बोलत राज ठाकरे यांनी राजू पाटील (MNS MLA Raju Patil) हे पक्षाची बाजू विधानसभेत एकटेच मांडत आहेत. विधानसभा भरली तर काय होईल यांचं. काही पक्षांना बांधलेले पत्रकार दुसऱ्या पक्षांबाबत गैरसमज पसरवतात. हे पत्रकार आम्हाला जे प्रश्न विचारतात ते इतर पक्षांना विचारणार नाहीत. ते लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करतात.

13 आमदार काय सोरटवर…

काही जण बोलतात, पक्ष सोडून गेली, मग लोक विचारतात सभेला गर्दी कशी होते.
मग 13 आमदार काय सोरटवर निवडून आली होती का? सोरट पण लोकांना कळतं. असो. मुळात हा प्रोपोगंडा आहे. जाणून बुजून प्रचार सुरू आहे. 2014,2019 च्या मोदी लाटेत काँग्रेसचं काय झालं. 17 वर्षात मला विचारतां काय झालं त्या काँग्रेसला विचारा.

Web Title :  MNS Chief Raj Thackeray | thane raj thackeray latest speech maharashtra navnirman sena foundation day raj thackeray on bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalna ACB Trap | 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाठी, कोतवाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

MP Supriya Sule | पीएमपी बसचा बावधन येथील पेबल्स सोसायटीचा थांबा पूर्ववत सुरू करा – खा. सुळे

CM Eknath Shinde On Maharashtra Budget 2023 | प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा, विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प ! गोरगरीब, शेतकरी, महिलांना न्याय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे