Pune Pimpri Chinchwad Crime News | कमकुवत दोर तुटल्याने सातव्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा दाखल; वाकड मधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | दोन ठिकाणी तुटलेल्या रस्सीला गाठ मारून काम चालु ठेवणे एका मजुराच्या जीवावर बेतले आहे. कमकुवत दोरी तुटल्याने इमारतीच्या 7 मजल्यावरून पडून प्लंबिंगचे काम करणाऱ्या मजुराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी (PCPC Police) ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.3) दुपारी तीनच्या सुमारास थेरगाव येथील 19 ग्रॅन्ड वेस्ट सोसायटी मध्ये घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

भानुप्रताप रमेशचंद्र सिंग (वय-26 रा. विशालनगर, पिंपळे निलख) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक नागनाथ सुर्यवंशी (PSI Nagnath Suryavanshi) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ठेकेदार गौरव नवनाथ चव्हाण (वय-20 रा. धनश्री बंगले, विशालनगर, पिंपळे निलख, पुणे) याच्यावर आयपीसी 304(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथील 19 ग्रॅन्ड वेस्ट सोसायटीतील (19 Grand West Society) बी मधील
फ्लॅट नं 104 येथील ड्राय बाल्कनीमध्ये आरोपी ठेकदाराकडून प्लबिंग मेंटेनन्सचे काम सुरु होते.
या ठिकाणी प्लंबिंगचे काम करणारा भानुप्रताप सिंग हा सातव्या मजल्यावर सिंगल रस्सीच्या झुलावर बसून प्लंबिंगचे
काम करत होता. त्यावेळी रस्सी तुटल्याने तो खाली पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तुटलेली रस्सी ही निकृष्ट दर्जाची व दोन जागेवर तुटलेल्या ठिकाणी
गाठ मारुन रस्सी जोडल्याचे दिसून आले. कामगारांना सुरक्षेचे योग्य ती साधने व सुविधा न पुरवल्याने कामगाराच्या
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ठेकेदार गौरव चव्हाण यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | सरकारी अनुदानाच्या अनुकूल अहवालासाठी लाच घेणारे जाळ्यात; सीबीआयची कारवाई

Pune Pimpri Chinchwad Crime News | किरकोळ कारणावरून महिलेला शिवीगाळ करुन विनयभंग, दोन महिलांसह तिघांवर FIR; मुंढवा परिसरातील प्रकार

FIR On BJP MLA Sunil Kamble | सावरणार्‍याच्याच कानशिलात मारली; भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल

पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करुन मांडीचा घेतला चावा, मुंढवा परिसरातील घटना