तडीपारीची नोटीस बजावलेल्या ‘त्या’ मनसे नेत्याला सोशलचा पाठींबा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांना काल (दि- 20) मुंबई पोलिसांनी दोन वर्षे तडीपारीची नोटीस बजावली आहे. आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत अशात नांदगावकर यांना मुंबईसह उपनगरातून तडीपार करण्याची नोटीस बजावली आहे. परंतु यानंतर मात्र या कारवाईला मनसे आणि नेटीझन्सकडून विरोध सुरू झाल्याचे दिसत आहे. नेटीझन्सने फेसबुक आणि ट्विटरवर #isupportnitinnandgaonkar या नावाने मोहिम सुरू केली आहे. अनेकांनी या मोहिमेअंतर्गत नांदगावकर यांना सपोर्ट करणारी पोस्ट टाकली आहे.

मुंबईतील अनेक वाईट गोष्टींवर त्यांनी पडदा टाकत त्या जनतेसमोर आणल्या आहेत. मुंबईत पासपोर्ट घोटाळा, ड्रग्स विकणारी टोळी, रिक्षा चालकांची दादागिरी नांदगावकर यांनी उघड केली होती. परंतु हे सगळे करत असताना त्यांनी कायदा हातात घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. इतकेच नाही तर, नांदगावकरांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे असाही आरोप केला गेला आहे आणि यानंतर त्यांना आता तडीपार करण्यात आले आहे.

 

नितीन नांदगावकर यांनी फेसबुकवर व्हिडीआे पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. या माध्यमातून त्यांनी पोलिसांच्या नोटीशीला उत्तर देताना संघर्ष अटळ असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सर्वसामान्य नागरिकांना माझी भीती वाटते असा आरोप ठेऊन मला तडीपार करण्यासाठी मुबंई पोलीस कामाला लागले आहेत. महाराष्ट्र माझा आहे. कुठे कुठे मला तडीपार करणार? जनतेने सांगावे मी कुठे चुकतोय? असे ते म्हणाले. इतकेच नाही तर, मी अन्यायाच्या विरोधात लढत राहणार असल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.
दरम्यान नेटीझन्स मात्र नितीन नांदगावकर यांचे समर्थन करत त्यांच्या तडीपारीच्या नोटीसीला जाेरदार विरोध केला आहे. सोशल मीडियावर isupportnitinnandgaonkar या नावाने मोहिम सुरू केली आहे. सोशल मीडियावर नेटीझन्सकडून नांदगावकर यांना जोरदार पाठिंबा मिळत आहे.
https://twitter.com/nakhate_santosh/status/1098165341253980160https://twitter.com/Rahul181992/status/1098169778240454656https://twitter.com/Dhee7001/status/1098231441559826432