MNS Leader Resign | मनसेला मोठा धक्का ! राज ठाकरेंच्या ‘त्या’ भूमिकेमुळे ‘इतक्या’ पदाधिकाऱ्यांचा मनसेला जय महाराष्ट्र !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Leader Resign | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढायला सांगितले असून त्यांनी राज्य सरकारला 3 मेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यांच्या या भूमिकेला सत्ताधारी पक्षाने विरोध केला आहे. मात्र त्याआधी त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा (MNS Leader Resign) दिला आहे.

 

मनसेचे कल्याणमधील (Kalyan) प्रदेश सचिव इरफान शेख यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा (MNS Leader Resign) दिला. यावेळी इरफान शेख यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट केली आहे. “आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शेवटचा ‘जय महाराष्ट्र’..!” मुंबई आणि मराठवाडा विभागातील एकूण 35 मुस्लिम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

 

ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे त्यामध्ये सचिव, शहराध्यक्ष. प्रसिद्धी माध्यम प्रमुख, जिल्हा सचिव, वाहतूक सेना उपाध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या पदांवरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना चालू असून भोंग्याच्या मुद्द्यामुळे राज ठाकरे राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत.

 

दरम्यान, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेतील नेत्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे मनसेला याचा मोठा फटका बसणार आहे.

 

Web Title :- MNS Leader Resign | MNS chief raj thackeray mns mumbai marathwada party bearers resigned on loudspeaker hanuman chalisa issue

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा