‘पत्री पुलाचे गर्डर लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही’

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – पत्री पुलाच्या गर्डर बसविण्याचे काम आजपासून हाती घेण्यात आले आहे. कल्याण-डोंबिवलीकरांसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या पत्री पुलाच्या कामाला आता वेग आला आहे. पण या पुलाच्या बांधकामाबाबत झालेल्या विलंबवरून आरोप-प्रत्यारोप काही थांबत नाहीत. या कामाची पाहणी करण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील आले होते. दरम्यान, पत्री पुलाच्या कामाला आधीच विलंब झाला आहे त्याचे गर्डन लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही. आदित्य ठाकरे यांचे डोंबिवली हे आजोळ आहे त्यांनी अन्य रखडलेल्या पुलांच्या कामातही लक्ष घालावे, असा टोला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी येथे ठाकरे यांना लगावला.

कल्याणमधील पत्री पुलाचे गर्डर टाकण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आला आहे यामध्ये यासाठी मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक देखील घेण्यात आला आहे दोन दिवस गर्डर बसविण्याचे काम चालणार आहे. हे कामानिमित्त पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

राजू पाटील यांच्या विधानानंतर पत्री पुलावरून आता शिवसेना-मनसे वाद चांगलाच पेटला आहे . पत्री पुलाचं काम रखडल्याने कल्याण डोंबिवलीकरांमध्ये रोष निर्माण झाला होता. विरोधकांकडून शिवसेना आणि रेल्वे प्रशासनावर जोरदार टीका सुरू होती. आज पत्री पुलाच्या गर्डरचे काम सुरू असताना मनसेचे आमदार राजू पाटील हे पुलाजवळ असलेल्या ९० फूट रस्त्यावरील अर्धवट असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. त्याच वेळी आयुक्त पत्री पुलाजवळ असल्याचा त्यांना कळालं. राजू पाटील कार्यकर्त्यांसोबत पत्री पूल परिसरात येताच पोलिसांनी त्यांना रोखले. त्यानंतर आयुक्त तिथून निघून गेल्याचे कळताच राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला. त्यांची आयुक्तांशी फोन चर्चा झाली. सोमवारी आयुक्तांची भेट घेणार असल्याचं राजू पाटील यांनी सांगितल.