MNS On Brijbhushan Singh | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे ब्रिजभूषण सिंह येणार पुण्यात; मनसेची भूमिका मात्र…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MNS On Brijbhushan Singh | मनसे पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून मनसेने मुंबई आणि महाराष्ट्रात कामाला येणाऱ्या उत्तर प्रदेशातील कामगारांचा विरोध करत स्वतःचा पाया मजबूत केला. महाराष्ट्रातील नोकऱ्यांवर पहिला महाराष्ट्रातील मराठी माणसाचा अधिकार आहे, असे म्हणत त्यांनी अनेक उत्तर भारतीयांवर हल्ले झाले. त्यानंतर त्यांच्या भूमिकेत आता बराच बदल झाला आहे. तरी, जेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी जोरदार विरोध केला होता. (MNS On Brijbhushan Singh)

त्याचा परिणाम म्हणजे राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आपला अयोध्या दौरा अखेर रद्द करावा लागला. आता तेच ब्रिजभूषण सिंह काही दिवसांत महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या निमित्ताने पुणे शहरात येणार आहेत. यावेळी मनसेची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे होते. त्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ब्रिजभूषण सिंह यांना कोणताही विरोध करणार नाही, अशी माहिती मनसेचे ते वसंत मोरे यांनी दिली. मनसेच्या या भूमिकेमुळे आता सर्वांनाच कोड्यात टाकले आहे. (MNS On Brijbhushan Singh)

वसंत मोरे म्हणाले, राज ठाकरे यांनीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही भूमिका ठरवली आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र सैनिक किंवा पक्षाचा इतर कोणताही नेता यांची याविषयी कुठलीही प्रतिक्रिया येणार नाही. राज ठाकरेंचा आदेशामुळे सर्व मनसे सैनिक शांत आहेत. प्रकृतीच्या कारणामुळे राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले नव्हते. त्याशिवाय इतर कोणताही विषय नाही. राज ठाकरे जरी अयोध्येला गेले नव्हते, तरी मनसैनिकांनी अयोध्येला जाऊन दर्शन घेतलं होते. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकाची ताकद किती आहे हे संपूर्ण देशाला माहीत आहे. ‘

मोरे म्हणाले, ‘…अन्यथा आमच्याही अंगाला लाल माती लागली आहे.
कुस्ती कशी खेळायची याविषयीदेखील आम्हाला चांगलेच माहीत आहे.
मात्र, राज ठाकरे यांचा आदेश असल्यामुळे ब्रिजभूषण सिंह यांना मनसे विरोध करणार नाही.
ब्रिजभूषण सिंह यांचे आम्ही स्वागत करू- राजकारणात कुणीही शत्रू नसतो,
त्याप्रमाणे कुस्तीचे नियमदेखील तसेच आहेत. पराभव झाल्यानंतरसुद्धा कुस्तीतले पैलवान एकमेकांची गळाभेट
घेत असतात. ही महाराष्ट्राची संस्कृती असल्यामुळे त्याप्रमाणेच ब्रिजभूषण सिंह यांचे आम्ही स्वागत करू.’

Web Title :- MNS On Brijbhushan Singh | MNSs u turn will not oppose brijbhushan singh coming to pune raj thackeray vasant more pune news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SPPU News | पुणे विद्यापीठात भोजनासाठी विद्यार्थ्यांना जादा पैसे मोजावे लागणार

Pune Rural Police | शौर्यदिनानिमित्ताने पुणे ग्रामीण पोलिसांना ‘हे’ अधिकार प्राप्त

IND vs BAN Test Series | पहिल्या कसोटीसाठी बांगलादेशचा संघ जाहीर; ‘हा’ अष्टपैलू खेळाडू करणार संघाचे नेतृत्व