MNS On Sharad Pawar | मनसेचा शरद पवारांना जोरदार टोला; म्हणाले – ‘दगडूशेठ गणपती दर्शनाला जायचं माहीत असून मुद्दाम…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MNS On Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी शुक्रवारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला (Dagdusheth Halwai Ganpati Temple) भेट दिली. यावेळी ट्रस्टमार्फत विश्वस्तांकडून पवार यांचे स्वागत करण्यात आले. पुढे त्यांनी भिडे वाड्याला भेट दिली. मात्र, मंदिर परिसरात गेल्यावर शरद पवारांनी मांसाहार केल्यामुळे बाप्पांचे बाहेरूनच दर्शन घेतले. यानंतर मनसेनं पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. (MNS On Sharad Pawar)

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. ”पाऊस पडत असतांना छत्री असून मुद्दाम पावसात भिजणे आणि दगडूशेठ गणपती दर्शनाला जायचं माहीत असून मुद्दाम मांसाहार करणे,” असं ट्वीट करत खोपकर यांनी पवार यांच्यावर टीका केली आहे.

 

Web Title :- MNS On NCP Chief Sharad Pawar Dagdusheth Halwai Ganpati Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा