Honey Side Effects | चुकूनही या पध्दतीनं करू नका मधाचे सेवन, आरोग्याचे फायद्याऐवजी होईल नुकसान; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Honey Side Effects | घसा खवखवणे बंद करायचे असो किंवा लठ्ठपणापासून मुक्ती हवी असो, तुम्ही आजपर्यंत मध (Honey) खाण्याचे अनेक फायदे ऐकले असतील आणि वाचले असतील. पण तुम्हाला माहित आहे का की मध जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने सेवन केल्याने तुमच्या आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. कसे ते जाणून घेवूयात (Honey Side Effects)…

 

पोषणतज्ञ आणि वेलनेस तज्ज्ञ वरुण कात्याल म्हणतात की असे मानले जाते की गरम पाण्यात मध मिसळल्यास ते विषारी होऊ शकते. मध कधीही गरम किंवा गरम वस्तूसोबत खाऊ नये. जर्नल एवाययू मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, 140 डिग्री तापमानात ठेवलेला मध विषारी बनतो (Honey Side Effects). गरम दुधात किंवा पाण्यात मध मिसळले किंवा गरम केल्यावर ते विषारी होते (Here Are 5 Things That Happen To You When You Eat Too Much Honey).

 

चुकीच्या पद्धतीने मध खाण्याचे तोटे (Disadvantages Of Eating Honey Incorrectly)

1. चहा आणि कॉफी सारख्या गरम पदार्थांसह (With Hot Foods Like Tea And Coffee) –
खूप कमी लोकांना माहिती असेल की मधाचे सेवन कधीही गरम पदार्थांसोबत करू नये. कारण मधाचा प्रभाव गरम असतो आणि तो गरम वस्तूसोबत खाल्ल्यास अतिसाराचा धोका जास्त असतो. आयुर्वेदानुसार, गरम वस्तूसोबत मध खाल्ल्याने ते पचण्यास कठीण जाते कारण ते गरम केल्यावर शरीरात विषारी पदार्थ तयार होतात.

2. तुपासोबत मध (Honey With Ghee) –
तुपासोबत मध खाऊ नये किंवा दोन्ही गोष्टी थोड्या अंतराने खाऊ नये. असे केल्याने आरोग्याला हानी पोहोचू शकते.

 

3. गरम पाणी (Hot Water) –
गरम पाण्यासोबत मध घेतल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. त्यामुळे पोटदुखी आणि इतर आजार होण्याची शक्यता वाढते. असे केल्याने चिंता आणि तणाव वाढतो.

 

3. रक्तदाब (Blood Pressure) –
मधामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. परंतु याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने हायपोटेन्शनचा धोका वाढू शकतो.

 

4. ओरल हेल्थ (Oral Health) –
मधाचे अतिसेवन तोंडाचे आरोग्य बिघडवण्याचे काम करते.
मधात असलेल्या साखरेचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने ती दातांना चिकटू शकते. जी नंतर दात किडण्यास कारणीभूत ठरते.

5. मुळा सोबत (With Radish) –
मध आणि मुळा हे एकमेकांचे शत्रू आहेत. मधासोबत मुळा खाल्ल्याने शरीरात विषारी पदार्थ तयार होतात.
त्यामुळे शरीराचे अवयव खराब होण्याचा धोकाही वाढतो. मध आणि मुळा यामध्ये सुमारे 1 तासाचे अंतर असावे.

 

Web Title :- Honey Side Effects | side effects of eating honey that will leave you surprised here are 5 things that happen to you when you eat too much honey

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | अविनाश भोसलेंच्या अटकेचं मला काय माहिती, आता काय सीबीआयला विचारायला जाऊ? अजित पवारांचा खोचक सवाल

 

Pune PMC Tax | पुणे महापालिका ! पहिल्या 57 दिवसांत पालिकेच्या मिळकत कर विभागाचे 751 कोटी 31 लाख रुपयांचे उत्पन्न

 

Avinash Bhosale Arrest Case | अविनाश भोसले अटक प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश; CBI नं मागितली होती 10 दिवसांची कोठडी