MNS On Uddhav Thackeray | ‘मामू’ तुम्हाला ‘मुन्नाभाई’चं काळीज कळायला…, मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS On Uddhav Thackeray | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी गोरेगाव (Goregaon) येथील मैदानावर झालेल्या शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना ‘मुन्नाभाई’ असे म्हणत डिवचले होते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत (Mumbai Municipal Corporation Elections) शिंदे गट (Shinde Group) आणि भाजप (BJP) आणि ‘मुन्नाभाई’ आपल्यावर हल्ला करणार आहेत. त्यामुळे ही लढाई किती अटीतटीची आहे हे लक्षात घ्या, असे आवाहन शिवसेनेच्या गटनेत्यांना केले होते. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला मनसेकडून (MNS) उद्धव ठाकरेंना थेट ‘मामू’ अर्थात ‘मुन्नाभाई MBBS’ (Munna Bhai M.B.B.S.) या चित्रपटातील बोमन ईरानी (Boman Irani) यांच्या पात्राची उपमा दिली आहे. (MNS On Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मनसे (MNS) प्रवक्ते गजानन काळे (Spokesperson Gajanan Kale) यांनी खोचक ट्विट केले आहे. आदित्य ठाकरेंसाठी (Aditya Thackeray) वरळीत मनसेचा उमेदवार न देता राज ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवला. 2012 ला एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ठाणे मनपात (Thane Municipality) सेनेच्या महापौर पदासाठी मनसेच्या 7 नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा दिला. ‘मुन्नाभाई’चं काळीज कळायला ‘मामू’ला सात जन्म घ्यावे लागतील. गेट वेल सून ‘मामू’, अशा शब्दात गजानन काळे यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे यांनी गोरेगावच्या सभेत राज ठाकरेंवर पुन्हा ‘मुन्नाभाई’ म्हणत निशाणा साधला होता.
काहीही करुन उद्धव ठाकरेंना संपविण्याचा विडा भाजपने उचलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी
(PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) आणि त्यांचे
चेलेचपाटे मुंबई जिंकण्यासाठी काहीच दिवसात मैदानात उतरतील आणि ज्याला आपल्या मुन्नाभाईची साथ असेल,
पण शिवसेनेच्या नादाला लागाल तर कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही.
शिवसेना म्हणजे रस्त्यावर पडलेली नाही. शिवसेनेच्या वाट्याला यायचा प्रयत्न करु नका.
सेना म्हणजे रस्त्यावर पडलेलं. झुरळं नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.

Web Title :-MNS On Uddhav Thackeray | mns gajanan kale mocks uddhav thackeray as mamu in munnabhai movie

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Eknath Shinde Group Vs Uddhav Thackeray | शिंदे गटाचे उद्धव ठाकरे यांना आव्हान, म्हणाले – ‘तुम्ही शिवाजी महाराजांचा फोटो काढा, आम्ही…’

MNS Chief Raj Thackeray | हनुमान चालिसानंतर आता बाल वेठबिगारी ! मनसेचे इंजिन नव्या विषयाकडे, राज ठाकरेंची सरकारकडे मागणी, कार्यकर्त्यांना दिले आदेश!!