‘घुसखोर कळवा अन् बक्षीस मिळवा’ ! मातोश्रीच्या बाहेर मनसेचे झळकले पोस्टर्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पाकिस्तानी आणि बांगलादेशी यांच्या विरुद्ध मनसेने आझाद मैदान येथे भव्य मोर्चा काढला, राज ठाकरे यांनी पाकिस्तानी आणि बांगलादेशी याना हटवा अशी मागणी केली. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये शोध मोहिम सुरु केली आहे.

औरंगाबाद येथे बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांची माहिती देणाऱ्यांना ५ हजार रोख रक्कम देण्यात येईल असे पोस्टर्स लावले त्यानंतर मुंबईतही अशाप्रकारचे बॅनर्स मनसेकडून झळकले आहेत. पुण्यामध्ये ही घुसखोर म्हणून पाहायला गेलेल्या कार्यकर्त्यांना भारतीय असल्याचा कळालं नंतर त्यालोकांनी मनसे विरुद्ध तक्रार केली. त्यामुळे मनसेने सावध पवित्र घेतला आहे .

Advt.

मनसेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात अशाप्रकारचे पोस्टर्स लावले आहेत. अखिल चित्रे यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. पाकिस्तानी आणि बांगलादेशी याना हाकललेच पाहिजे. त्या पोस्टरवर असे लिहलं आहे घुसकोर कळवा बक्षिसे जिंका. या मोहिमेत समोर आलेल्या माहितीची शहानिशा करुन सत्यता पटल्यानंतर माहिती देणाऱ्यास रोख बक्षीस ५ हजार ५५५ रुपये दिले जाईल. तसेच माहिती देणाऱ्याचे नाव संपूर्ण प्रक्रियेत गुप्त ठेवण्यात येईल असंही अखिल चित्रे यांनी सांगितले आहे.

घुसखोरांना हाकला हि भूमिका बाळासाहेब ठाकरे यांची आहे, उगाच श्रेय घेऊ नका असा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना टोला दिला आहे.माननीय मुख्यमंत्रीसाहेब पाकिस्तान आणि बांग्लादेशी घुसखोरांना हाकलंलच पाहिजे हीच आपली भूमिका असेल तर प्रथम वांद्रेतील अंगणात घुसखोरांनी भरलेले मोहल्ले साफ करा असं आव्हान मनसेकडून देण्यात आलं होतं.

यादरम्यान औरंगाबादमध्ये आकाशवाणी चौकात मनसेने एक स्टॉल उभारला आहे. या स्टॉलवर घुसखोरांची गुप्तपणे माहिती द्यायची. माहिती देणाऱ्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल. पण घुसखोरांची माहिती खरी आले तर माहिती देणाऱ्या व्यक्तिला पाच हजार रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार असल्याचं मनसेने स्पष्ट केलं आहे.