MNS | ‘चिन्ह गोठवण्याची वेळ एखाद्या पक्षावर यावी हे दु:खद, पण…’; मनसेने कुणाला धरले जबाबदार?

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे धनुष्यबाण हे पक्षचिन्ह (Dhanushyaban Symbol) गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने (Election Commission) घेतला आहे. या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या निर्णयावर भाजपा (BJP) आणि मनसे (MNS) या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टार्गेट केले आहे. मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी तर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची खिल्ली उडवली आहे. आता मनसे (MNS) नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांची प्रतिक्रिया आली असून त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली असली तरी पक्षचिन्ह जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांनाच जबाबदार धरले आहे.

 

मनसे (MNS) नेते प्रकाश महाजन यांनी म्हटले की, निवडणूक आयोगाचा निर्णय तांत्रिकदृष्ट्या योग्य असला तरी एखाद्या पक्षावर ही वेळ यावी ही दु:खद घटना आहे. याचे कुठेही राजकीय भांडवल करावे हा माझ्या नेत्याचा स्वभाव नाही. नामुष्कीची वेळ आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जबाबदार आहेत. निष्पाप असल्याचा बुरखा पांघरतात. राजकारणात शपथा घेऊन चालत नसते. मृत माता-पित्याचा आधार घ्यावा लागला. सल्लागार चुकीचा असल्यावर काय होऊ शकतं हे उद्धव ठाकरे उदाहरण आहेत.

 

प्रकाश महाजन म्हणाले, बाळासाहेबांनी कष्टाने शिवसेना (Shivsena) पक्ष उभा केला. राज ठाकरेही (Raj Thackeray) आनंदित झाले नसतील. परंतु उद्धव ठाकरे अहंकारात बुडाले होते. राजकारणात डावपेच सुरू असतात. आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. ज्यांना जायचे त्यांनी जावे, दरवाजे उघडे आहेत अशी भाषा वापरली. प्रत्येक जण चुकीचा हे बरोबर असे होत नाही.

महाजन पुढे म्हणाले की, राज ठाकरे धनुष्यबाण गोठवल्याने दु:खीच असतील. राजकारण राजकारणासारखे असते.
राज ठाकरे बाहेर पडले तेव्हा कित्येक आमदार, नगरसेवक त्यांच्यासोबत येणार होते.
परंतु कधीच कुणाला बोलावले नाही. राज ठाकरेंनी कधीही धनुष्यबाण, शिवसेनेवर अधिकार सांगितला नाही.
सेनापती कुशल, लोकप्रिय असेल तर पराभवातून उभे राहून विजय मिळवू शकतो.
सेनापती कटकारस्थान करणारा असेल तर तो उभे राहू शकत नाही.

 

प्रकाश महाजन म्हणाले, इंदिरा गांधी (Indira Gandhi), शरद पवार (Sharad Pawar) बाहेर पडले तेव्हा मूळ पक्षाला फायदा झाला नाही.
काही अपवादात्मक असू शकतात. युती तोडली हेच उद्धव ठाकरेंची चूक झाली.
मी खरा आहे दाखवण्यासाठी मृत आईवडिलांची, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्यावी लागली.
सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या बाजूने थोडीफार जाऊ शकते. निवडणूक आयोगाचा निर्णय खेदजनक आहे.
परंतु तांत्रिकदृष्ट्या निर्णय योग्य असू शकतो. परंतु ही वेळ पक्षप्रमुखांमुळे आली.

 

Web Title :- MNS | raj thackeray saddened by freezing of bow and arrow shivsena symbol but responsible to uddhav thackeray by mns

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray | ‘PM मोदी हे नोटबंदीनंतर घासलेलं नाणं’ उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

Pune Crime | ‘जमतारा पॅटर्न’ ऑनलाईन फसवणूक प्रकरणात आरोपीला जामीन मंजूर

Anil Desai | धनुष्यबाण गोठवल्यानंतर अनिल देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘निवडणूक आयोगाचा निर्णय अनाकलनीय, बोलण्याची संधी…’