MNS Vs Shivsena | प्रभादेवीतील घटनेवरून मनसेची पुन्हा शिवसेनेवर खोचक टीका, अडीच वर्षांत जे पेरले, ते आता…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Vs Shivsena | शिवसेनेने अडीच वर्षांत लोकांवर खोट्या केसेस टाकल्या, त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर आणि संतोष धुरीवर (Santosh Dhuri) खोटी केस टाकली की महिला कॉन्स्टेबलला (Lady Constable) धक्का दिला. ती महिला कॉन्स्टेबल आता आहे कुठे? तिचे स्टेटमेंट नाही, काही नाही. गेल्या अडीच वर्षांत अशा अनेक खोट्या केसेस तुम्ही लोकांवर टाकल्या. त्यामुळे जे पेरले, ते उगवतेय, असे म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी प्रभादेवीच्या (Prabhadevi Case) घटनेवरून पुन्हा एकदा शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. (MNS Vs Shivsena)

 

मुंबईत प्रभादेवी येथे दहा दिवसांच्या गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान (Ganapati Immersion Procession) शिंदे गट (Shinde Group) आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. शिंदे गटाचे सदा सरवणकर (Sada Saravankar) यांचे पुत्र समाधान सरवणकर (Saadhan Saravankar) यांनी ‘म्याँव म्याँव’ म्हणत शिवसेनेला डिवचणारे भाषण केल्याने वातावरण तापले होते. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने वाद मिटला. (MNS Vs Shivsena)

परंतु, शनिवारी रात्री पुन्हा एकदा दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला. यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना आमदार सुनील शिंदे (MLA Sunil Shinde) यांनी केला आहे. दरम्यान, गोळीबाराचा आरोप सरवणकर यांनी फेटाळून लावला असून हा कौटुंबिक वाद असल्याचे म्हटले आहे. (MNS Vs Shivsena)

 

यावरून मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेवर खोचक टीका केली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले की, दादर, माहीम, प्रभादेवी हे एक सुसंस्कृत मतदारसंघ आहेत.
अशा प्रकारच्या हाणामार्‍या करायला हे बिहार नाही.
पोलिसांनी योग्य ती चौकशी करावी आणि जे दोषी असतील, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी.

 

Web Title :- MNS Vs Shivsena | mns sandeep deshpande mocks shivsena on
prabhadevi sarvankar firing shivsena sunil shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा