मोबाईल स्नॅचिंग करणारे चिंचवड पोलिसांच्या ताब्यात

चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – रस्त्याने मोबाईलवर बोलत जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल हिसकावून नेणाऱ्या सराईत चोरट्याला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून महागडे मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी चिंचवड पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच एका तडीपार गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे.
केतन मिलिंद गायकवाड (वय-२४ रा. नक्षत्रम बिल्डींग, घरकुल, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर मंगेश सांगळे असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे.

केतन आणि त्याच्या इतर अल्पवयीन साथीदारांनी पिंपरी परिसरात मोबाईल स्नॅचिंग केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यांच्याकडून महागडे मोबाईल, एक टॅब असा एकूण ८५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी आकुर्डी, निगडी, पिंपरी, चिंचवड परिसरात मोबाईल चोरी केली होती.
पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला आरोपी मंगेश सांगळे हा हॉटेल रुद्र जवळ असलेल्या चहाच्या टपरीवर उभा असल्याची माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून तडीपार आरोपी सांगळे याला अटक केली. त्याला एप्रिल २०१९ मध्ये एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अतिरीक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सह पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस हवालदार जगताप, शेलार, पाटील, भदाणे, राठोड, माने, राजू जाधव यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त 

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या