Modi Government | बेरोजगारी भत्ता पाहिजे असेल तर तात्काळ करा रजिस्ट्रेशन, जाणून घ्या प्रक्रिया अन् कसा मिळेल लाभ

नवी दिल्ली : Modi Government | कोरोना काळात लाखो लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत, त्यातच नवीन नोकर्‍या उपलब्ध होत नसल्याने देशात बेरोजगारांचा आकडा प्रचंड वाढला आहे. मात्र, सरकार (Modi Government) बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता (unemployment allowance) देते. बेरोजगारांना भत्ता देण्यासाठी सरकारने अटल विमित व्यक्ती कल्याण योजना (Atal Beemit Vyakti Kalyan Yojana) नावाने एक योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत 50 हजारपेक्षा जास्त लोक लाभान्वित झाले आहेत. कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) ही योजना चालवते.

कोरोना महामारीचे संकट पाहता सरकारने ’अटल विमित व्यक्ती कल्याण योजना’ 30 जून 2022 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी 30 जून 2021 पर्यंत होती.

Nitin Gadkari | नितिन गडकरींनी अनेक वर्षे पत्नीपासून लपवले हे मोठे गुपित, रस्त्यासाठी पाडले होते सासर्‍याचे घर

काय आहे ’अटल विमित व्यक्ती कल्याण योजना?

’अटल विमित व्यक्ती कल्याण योजना (Atal Beemit Vyakti Kalyan Yojana) अंतर्गत नोकरी गेल्याने बेरोजगार लोकांना आर्थिक मदतीसाठी भत्ता दिला जातो. बेरोजगार व्यक्ती 3 महिन्यासाठी या भत्त्याचा लाभ घेऊ शकते. 3 महिन्यासाठी सरासरी सॅलरीच्या 50% क्लेम करता येतो. बेरोजगार झाल्याच्या 30 दिवसानंतर योजनेत सहभागी होऊन क्लेम करता येतो.

असा घ्या योजनेचा लाभ

ESIC मध्ये सहभागी कर्मचारी ईएसआयसीच्या कोणत्याही शाखेत जाऊन यासाठी अर्ज करू शकतात. यानंतर ईएसआयसीकडून अर्जाची पडताळणी केली जाईल आणि योग्य असल्यास कर्मचार्‍याच्या खात्यात पैसे पाठवले जातील.

कोण घेऊ शकतात लाभ?

1. या योजनेचा लाभ प्रायव्हेट सेक्टर (आर्गनाईज्ड सेक्टर) मध्ये काम करणारे नोकरदार लोक बेरोजगार झाल्यानंतर घेऊ शकतात, ज्यांचा कंपनी दरमहिना PF/ESI सॅलरीमधून कापून घेते.

2. ESI चा फायदा खासगी कंपन्या, कारखाने आणि कारखान्यात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना मिळतो. यासाठी ESI कार्ड तयार केले जाते.

3. कर्मचारी या कार्डवर किंवा कंपनीकडून लावलेल्या कागदपत्रांच्या आधारावर योजनेचा लाभ घेऊ शकतो. ईएसआयचा लाभ त्या कर्मचार्‍यांना मिळतो ज्यांचे मासिक उत्पन्न 21 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे.

असे करा रजिस्ट्रेशन

1. योजनेचा लाभ देण्यासाठी सर्वप्रथम ESIC च्या वेबसाइटवर अटल विमित व्यक्ती कल्याण योजनेचा फॉर्म डाऊनलोड करा.

2. https://www.esic.nic.in/attachments/circularfile/93e904d2e3084d65fdf7793…

3. आता फॉर्म भरून कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) जवळच्या ब्रँचमध्ये जमा करा.

4. यानंतर, फॉर्मसोबत 20 रुपयांचा नॉन-ज्यूडिशियल स्टॅम्प पेपरवर नोटरीचे अफिडेव्हिड सुद्धा लागेल.

5. यामध्ये AB-1 पासून AB-4 फॉर्म जमा केला जाईल.

6. चुकीच्या वर्तणुकीसाठी नोकरी गेली असल्यास लाभ मिळणार नाही.

7. गुन्हेगारी प्रकरण दाखल होणे किंवा स्वेच्छा निवृत्त घेणार्‍या कर्मचार्‍यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही.

हे देखील वाचा

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! SIM card बाबत ‘हा’ नियम बदलला, जाणून घ्या

Pune Crime | जामीनावर सुटलेल्या गुंड सुरज रसाळवर टोळक्याकडून कोयत्याने वार; उंड्रीमध्ये जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Modi Government | atal beemit vyakti kalyan yojana extended unemployment allowance know how to earn money government scheme

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update