Modi Government | DA मध्ये पुन्हा झाली वाढ ! काही सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात करण्यात आली 12 टक्केपर्यंत वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   Modi Government | केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) ने काही सरकारी कर्मचार्‍यांना पुन्हा दिवाळीची भेट (Diwali Gift) दिली आहे. केंद्र सरकारच्या 6 व्या वेतन आयोगाच्या (6th pay commission) शिफारसी अंतर्गत आणि केंद्रीय आरोग्य संस्थांचा 5 व्या वेतन आयोगाच्या (5th pay commission) शिफारसी अंतर्गत वेतन घेणार्‍या कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता वाढवला (DA Hike) आहे.

 

कुणाचा किती वाढला महागाई भत्ता

 

अर्थ मंत्रालयानुसार (Finance Ministry) 6 व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार वेतन घेणार्‍या मोदी सरकारच्या (Modi Government ) कर्मचार्‍यांचा (Central Govt Employees) महागाई भत्ता 7 टक्के वाढवला आहे. तर, 5 व्या वेतन आयोगाच्या शिफारसींच्या आधारावर वेतन घेणार्‍या केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या कर्मचार्‍यांचा (CAB Employees) महागाई भत्ता 12 टक्के वाढवला आहे.

 

कधीपासून लागू मानली जाई वाढ

 

अर्थ मंत्रालयाकडून जारी निवेदनात म्हटले आहे की ही वाढ 15 जुलै 2021 पासून लागू मानली जाईल.
6 व्या वेतन आयोगाच्या शिफारसी अंतर्गत वेतन घेणार्‍या केंद्र सरकारी आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता मुळ पगाराच्या (Basic Salary) 189 टक्के वाढवून 196 टक्के केला आहे.

 

5 व्या वेतन आयोगाच्या शिफारसींनुसार वेतन घेणार्‍या कर्मचार्‍यांचा डीए आतापर्यंतच्या 356 टक्केवरून वाढवून 368 टक्के केला आहे.
केंद्राच्या निवेदनात म्हटले आहे की, मोदी सरकार (Modi Government) आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या फ्री-रिवाईज्ड वेतन घेणार्‍या कर्मचार्‍यांचा डीए वाढवला आहे.

 

Web Title : Modi Government | Modi government employees da hiked by 12 percent for central and autonomous body employees salary hike calculation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Amruta Fadnavis | ‘जागतिक कामांबद्दलचं ‘नोबेल’ गेलं; पण अमृता फडणवीस यांना भारतरत्न द्या’ – हरी नरके

Khajoor 10 Benefits In Winter | खजूरला वंडर फ्रूट का म्हणतात? जाणून घ्या हिवाळ्यात खाण्याचे 10 फायदे

RTMNU Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात 109 जागांसाठी भरती; पगार 24,000 रुपये