Modi Government | मोदी सरकार 2.0 साठी खास आहे 5 ऑगस्ट, यावेळी सुद्धा विरोधकांना देणार का आश्चर्याचा धक्का?

नवी दिल्ली : Modi Government | आज 5 ऑगस्ट आहे. मागील 2 वर्षापासून 5 ऑगस्टला मोदी सरकार (Modi Government) ऐतिहासिक निर्णय घेत आले आहे. 2019 मध्ये पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर काही महिन्यातच नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केले. मागील वर्षी 5 ऑगस्टला पंतप्रधानांनी अयोध्यामध्ये राम मंदिराची पायाभरणी केली होती. आता प्रश्न असा आहे की, यावेळी 5 ऑगस्टला काय होणार.

मोदी सरकारचे 5 ऑगस्टसाठी पुढील टार्गेट काय आहे. हा प्रश्न उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एका वक्तव्याने सुद्धा आणखी रोचक झाला आहे. अमित शाह यांच्या उपस्थितीत योगी आदित्यनाथ यांनी ज्या पद्धतीने भाजपासाठी 5 ऑगस्टचे महत्व सांगितले त्यावरून प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे की, मोदी सरकार यावेळी काय करणार आहे.

5 ऑगस्ट पवित्र तिथी : सीएम योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले की, 5 ऑगस्टची पवित्र तिथी आमच्यासाठी महत्वाची आहे. 5 ऑगस्टची तिथी सर्जिकल स्ट्राईकसाठी ओळखली जाते. 5 ऑगस्टच्या तिथी काश्मीरसाठी कलम 370 समाप्त करणारी ओखळली जाते आणि भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराची पायाभरणी सुद्धा याच दिवशी करण्यात आली होती.

आता समान नागरी कायदा?

भाजपाच्या जन्मापासून आतापर्यंत, अटल बिहारी वाजपेयी यांच्यापासून नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत,
सर्वांची मोठी स्वप्न होती की, पहिले जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवणे, दुसरे अयोध्यामध्ये राम
मंदिर उभारणे आणि तिसरे समान नागरी कायदा. आपल्या दुसर्‍या कार्यकाळात पंतप्रधानांनी
पहिल्या दोन वर्षात 3 पैकी 2 स्वप्न पूर्ण केली आहेत. ज्यासाठी 5 ऑगस्ट दिवस निवडला. आता
समान नागरी कायदा स्वप्न बाकी आहे.

हे देखील वाचा

Pune Corporation | चार वर्षात ठेकेदारांच्या टँकरच्या फेर्‍या झाल्या ‘दुप्पट’ ! पुण्यामध्ये दिवसेंदिवस पाणी टंचाई वाढतेय की पालिकेलाच लागलीय ‘गळती’

Tokyo Olympics | हॉकीतील 4 दशकाचा दुष्काळ समाप्त ! भारताने जर्मनीवर 5-4 ने मात करुन ‘कांस्य’ पटकाविले

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Modi Government | narendra modi 20 government special day 5 august article 370 jammu kashmir ayodhya ram mandir now what

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update