फायद्याची गोष्ट ! मोदी सरकारची नवी ‘स्कीम’, फक्त 1000 रूपयांच्या गुंतवणूकीतून दर 6 महिन्याला होईल ‘कमाई’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   मागील 1 जुलैरोजी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एक खास स्कीम लाँच केली आहे. या स्कीमचे नाव टॅक्सेबल फ्लोटिंग रेट सेव्हिंग्स बाँड आहे. या स्कीमअंतर्गत गुंतवणूक करणार्‍या गुंतवणुकदारांना प्रत्येक 6 महिन्याला फायदा मिळेल. या स्कीमबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

हा एक बाँड आहे. यात गुंतवणुकीसाठी तुम्हाला बाँड खरेदी करावा लागेल. हे बाँड 7 वर्षांचे असतील आणि त्यांच्यावर वर्षातून दोनदा 1 जानेवारी आणि 1 जुलैला व्याज दिले जाईल.

समजा, तुम्ही या बाँडमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला 1 जानेवारी 2021ला याचे व्याज मिळेल. हे व्याज 7.15 टक्के दराने असेल.

प्रत्येक पुढील सहामाहीसाठी सहा-सहा महिन्यानंतर व्याज नव्या पद्धतीने ठरवले जाईल. सहा महिने पूर्ण होताच व्याजाचे पैसे गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा होतील.

किती करू शकता गुंतवणूक

बाँडमध्ये कमीतकमी 1000 रुपयांची गुंतणूक करावी लागेल. तर, गुंतवणुकीची कोणतीही कमाल मर्यादा असणार नाही.

कशी करू शकता गुंतवणूक

बाँड कोणतीही सरकारी बँक, आयडीबीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेतून खरेदी करता येतील. कॅशद्वारे कमाल 20 हजार रुपयांचे बाँड खरेदी करता येतील.

याशिवाय ड्राफ्ट, चेक आणि इलेक्ट्रॉनिक पेमेन्ट मोडने सुद्धा बाँड खेरदी करता येऊ शकतात. बाँड केवळ इलेक्ट्रॉनिक रूपात खरेदी करता येतील.

मात्र, हे टॅक्स सेव्हिंग बाँड नाहीत, यामुळे यावर मिळणार्‍या व्याजाच्या उत्पन्नावर नियमानुसार इन्कम टॅक्स भरावा लागेल.