Ramzan Eid : मोदी सरकारची मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी ‘ही’ मोठी घोषणा

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवनिर्वाचित नरेंद्र मोदी सरकारनं ईदच्या निमित्तानं मुस्लिम विद्यार्थ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. मुस्लिम समुदायातील ५ कोटी मुस्लिम विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवून देणार आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली.

या शिष्यवृत्ती योजनेविषयी बोलताना मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, ‘मुस्लिम मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ‘पढो-बढो’ हे अभियान चालवलं जाणार आहे. शिक्षणासाठी मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून प्रसार करण्यात येणार असून, देशभर हे अभियान चालवलं जाणार आहे. शिक्षण, रोजगार आणि सशक्तीकरण हे आमचं लक्ष्य आहे. ही लक्ष्य गाठण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या योजनेंतर्गत लाभ मिळण्याची प्रक्रिया आणखी सुलभ आणि पारदर्शी करण्यात आली आहे.’

ADV

कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. तसेच दहशतवादी आणि माओवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या स्कॉलरशिपमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता ५ कोटी मुस्लिमांना प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवूनदेणार आहे.