मोदी सरकारकडून नवीन वर्षाचं गिफ्ट ! छोट्या उद्योगांसाठी आता कर्ज मिळणं झालं ‘एकदम’ सोपं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. त्याचा मोठा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनात होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या अर्थव्यव्यवस्थेवर मोठे संकट निर्माण झाले आहे. यासाठी आता अनेक प्रयत्न केले जाताहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लघु आणि मध्यम उद्योगांत असणाऱ्या व्यवसायिकांसाठी मोठी घोषणा केली आहे.

व्यवसायासाठी सोप्या पद्धतीने आणि स्वस्त दरात कर्ज मिळावे या योजनेची घोषणा केली आहे. यामुळे नवीन व्यवसायिकांना नक्की फायदा होईल अशा आशा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. गडकरी म्हणाले, MSME उद्योगांना सध्या ज्या दराने कर्ज दिलं जातं त्यात किमान दोन टक्क्यांची सुट दिली जाणार आहे. एक कोटींपर्यंत कर्ज मिळणे यामध्ये सोपे होणार आहे. त्यामुळे व्यवसायिकांना मोठा फायदा या योजनेमध्ये होणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2019 – 20 या आर्थिक वर्षाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात ही योजना आणली होती. या योजनेमागील मंत्रालयाचा हेतू असा होता की थकबाकीदारांना काही अंशतः सूट देऊन असे सर्व वाद मिटवावेत. 1 सप्टेंबर 2019 पासून सरकारने ही योजना केवळ 4 महिन्यांसाठी लागू केली.

या योजनेंतर्गत सरकारला आतापर्यंत एकूण 55 हजार 693 अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये 29.557.3 कोटी रुपयांचा कर विवादास्पद आहे. अर्थ मंत्रालयाने ही योजना सुरू केली तेव्हा, त्यासंबंधी एकूण 1.83 लाख कर बाकी होते, त्यापैकी सुमारे 3.5 लाख कोटी अडचणीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/