Modi Govt – Ujjwala Yojana Subsidy | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! एलपीजी सिलेंडरवर मिळणार 300 रूपयांची सबसिडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Govt – Ujjwala Yojana Subsidy | केंद्र सरकारची लोकप्रिय योजना उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाने दिवाळीपूर्वीच मोठी गिफ्ट दिली आहे. मोदी मंत्रिमंडळची बुधवारी (दि.4) बैठक झाली. या बैठकीत उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी असलेले अनुदान 200 रुपयांवरुन 300 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, गेल्या महिन्यात रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने एलपीजीच्या दरात 200 रुपयांची कपात करण्यात आली होती. तर आज उज्ज्वला लाभार्थींच्या अनुदानाची रक्कम 200 रुपयांवरुन 300 रुपयापर्य़ंत वाढवण्यात आली आहे. (Modi Govt – Ujjwala Yojana Subsidy)

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने आम्ही एलपीजी सिलिंडर 200 रुपयांनी कमी केले. त्यानंतर एलपीजी सिलिंडरची किंमत 1100 रुपयांवरुन 900 रुपयापर्यंत कमी झाली होती. तर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 700 रुपयांना गॅस उपलब्ध झाला. आता या योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपये अनुदान (सबसिडी) मिळणार आहे. म्हणजेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता 600 रुपयांना गॅस सिलिंडर उपलब्ध होणार आहे. (Modi Govt – Ujjwala Yojana Subsidy)

8400 कोटी रुपयांच्या हळदीच्या निर्यातीचे उद्दिष्ट

इतर निर्णयांची माहिती देताना अनुराग ठाकूर म्हणाले, भारत हा हळदीचा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक आहे. 8400 कोटी रुपयांच्या हळदीच्या निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी केंद्रीय हळद मंडळाच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली आहे. तसेच, उत्तर कोळसा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 2400 कोटी रुपये खर्च केले जातील. बिहारमधील औरंगाबाद, गया, गढवा आणि झारखंडमधील पलामूलला याचा फायदा होणार आहे. तेलंगणात वनदेवतेच्या नावाने केंद्रीय आदिवासी विद्यापीठ सुरु करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी 889 कोटी रुपये केंद्र सरकार खर्च करणार आहे.

https://x.com/ANI/status/1709506694328541692?s=20

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | येरवडा कारागृहात कैद्यामध्ये पुन्हा राडा ! कैद्यावर धारदार वस्तूने वार

ACB Trap News | 10 हजार रुपये लाच घेताना विस्तार अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात