×
Homeआंतरराष्ट्रीयMoeen Ali | इंग्लंडच्या मोईन अलीने भर पत्रकार परिषदेत जेवणावरून केली पाकिस्तानवर...

Moeen Ali | इंग्लंडच्या मोईन अलीने भर पत्रकार परिषदेत जेवणावरून केली पाकिस्तानवर टीका, म्हणाला….

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Moeen Ali | इंग्लंड (Enagland) जवळजवळ 17 वर्षांनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला होता. यावेळी त्यांनी इंग्लंडने पाकिस्तानला त्यांच्या घरच्या मैदानावर मात दिली आहे. या मालिकेत 3-3 अशी आघाडी असताना इंग्लंडने शेवटच्या सामन्यात पाकिस्तानचा ( Pakistan) धुव्वा उडवत 67 धावांनी सामना जिंकला. यामुळे पाकिस्तानला टीकेला सामोरे जावे लागले. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये इंग्लंडचा कर्णधार मोईन अलीने (Moeen Ali) पाकिस्तानची अब्रू काढली.

काय म्हणाला मोईन अली ?
शेवटच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत इंग्लडचा कर्णधार मोईन अली (Moeen Ali) म्हणाला कि, “संघासाठी केलेली सुरक्षा व्यवस्था अतिशय चांगली होती. आमच्या अपेक्षेपेक्षा आमची चांगली काळजी घेण्यात आली आणि व्यवस्था छान होती. खाण्या-पिण्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर लाहोरमध्ये माझी थोडी निराशा झाली. लाहोरमधील जेवण चांगले नव्हते. त्यापेक्षा कराचीमधले जेवण जास्त बरे होते. तरीही ठीक आहे. साहजिकच हे सर्व खरोखर चांगले झाले, परंतु मला काही गोष्टी थोड्या निराशाजनक आढळल्या.”

शॉन टेटनेसुद्धा काढली होती पाकिस्तानची अब्रू
पाकिस्तानचा गोलंदाजी प्रशिक्षक शॉन टेट (Shaun Tait) यानेदेखील एका पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानच्या संघाचा अपमान केला होता.
या मालिकेतील सहावा सामना हरल्यानंतर शॉन टेटने पत्रकार परिषदेत पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली आणि म्हटले की, ‘जेव्हा आम्ही वाईट पद्धतीने हरतो तेव्हा पाकिस्तानी संघ व्यवस्थापन मला पत्रकार परिषदेत पाठवतात.’
त्यांच्या या विधानाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.

Web Title :- Moeen Ali | england captain moeen ali slams pakistan over lahore food after pak vs eng t20 series

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Sharma | आफ्रिकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर देखील रोहित शर्माला सतावत आहे ‘हि’ चिंता

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला ‘दे धक्का’, राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हाध्यक्षाचा ई-मेलवरुन राजीनामा

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News