ऑस्ट्रेलिया दौर्‍यात ‘नाव’ कमविणार्‍या मोहम्मद सिराजनं स्वतःलाच दिलं ‘भन्नाट’ गिफ्ट !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी अत्यंत प्रभावी गोलंदाजी केली आहे. भारताचे अनुभवी गोलंदाज इशान शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे दुखापतीमुळे टीमच्या बाहेर आहेत. तरीही मोहम्मद सिराजने दोन कसोटी खेळल्याने या झालेल्या गॅबा कसोटीत गोलंदाजांचे नेतृत्व जबाबदारीने आणि सक्षमपणे सांभाळले. गॅबा कसोटीत तब्बल ५ विकेट्स घेऊन सिराजने घेतले आहेत. यामुळे सिराजने अनेक गोलंदाज्यांचे विक्रम मोडले आहे. मोहम्मद सिराजने कसोटीमध्ये सर्वाधिक १३ विकेट्स घेतल्या आहेत. दमदार गोलंदाजाची कामगिरी त्याने पार पाडली आहे. ऐतिहासिक कामगिरीनंतर मायदेशी परतलेल्या सिराजनं स्वतःच एक जबरदस्त गिफ्ट दिलं आहे. त्यानंतर सोशल मीडियावर सिराजची चर्चा रंगताना दिसत आहे.

भारत ०-१ अशा पिछाडीवर पडला होता. त्यानंतर मोहम्मद सिराज, शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, शार्दूल ठाकूर या युवा खेळाडूंच्या जोरावर भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी पुन्हा स्वतःकडे ठेवली. तर अनेक खेळाडू दुखापतग्रस्त आहे. ऑसी फॅन्सकडून वर्णद्वेषी शेरेबाजी या सर्वांवर मात करून भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २-१ असा कसोटी मालिका जिंकला आहे. या सर्व खेळाडूंचे मायदेशात आल्यावर जंगी स्वागत केले आहे.ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दाखल झाल्यानंतर सिराजच्या वडिलांचे मायदेशात निधन झाले. तसेच मोहम्मद सिराज मायदेशात परतताच तो दफनभूमीत त्याच्या वडिलांच्या कबरीचे दर्शन घेण्यासाठी गेला.

कोरोना नियमांमुळे त्याला त्यांच्या अंत्यसंस्कारालाही जाता आले नाही. तो टीम सोबतऑस्ट्रेलियात थांबला आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. कसोटी मालिकेत उतरल्यावर त्यानं अनेक दिग्गजांच्या ओळीत स्थान निर्माण केले आहे. सिराज हैदराबादला परतला आणि त्यानं शुक्रवारी स्वतःसाठी एक भारी गिफ्ट खरेदी केली. त्यानं नवी BMW खरेदी केली आहे. तर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही सिराजचे तौंडभरून कौतुक केले. ते म्हणाले होते की,”या दौऱ्यावर आम्हाला मोहम्मद सिराज नावाचा वेगानं मारा करणारा गोलंदाज सापडला. वडिलांचे निधन, ऑसी फॅन्सकडून वर्णद्वेषी शेरेबाजीचे रुपांतर त्यानं ताकदीत केलं आणि मैदानावरील कामगिरीनं सर्वांची वाहवाह मिळवली.”