Mohan Bhagwat | मोहन भागवतांच्या वक्तव्यावर ब्राह्मण महासंघाचा संताप, तुम्ही देशात जातीयवाद वाढवताय, इथला हिंदू नराधमांच्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mohan Bhagwat | आपण आपल्याच लोकांना मान खाली घालावी लागेल अशा पद्धतीने वागवले. परिणामी, आपल्यातील दरी वाढत गेली. दुर्दैवाने हे पाप आपल्याकडून घडले. त्यामुळे आता याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही. धर्मशास्त्राला जातीगत विषमता अजिबात मान्य नाही, जातीव्यवस्था हद्दपार झाली पाहिजे, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी नागपुर येथील एका कार्यक्रमात केले होते. या वक्तव्यावर अनेक स्तरातूर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर आता ब्राह्मण महासंघाने (Brahmin Federation) भागवत यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.

 

मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी म्हटले होते की नुसतं माफी मागून चालणार नाही. आपण व्यवहारामध्ये या सर्व वर्गाबाबत भूमिका कशी घेतो, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत, असे म्हटले होते.

 

तर, मोहन भागवतांच्या (Mohan Bhagwat) या विधानावर ब्राह्मण महासंघाने तीव्र शब्दांत आक्षेप घेत संताप व्यक्त केला आहे.
ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, त्यांचे वक्तव्य चुकीचे आणि पूर्ण अभ्यासाशिवाय केलेले आहे.
त्या काळी काही ब्राह्मणांनी चुका केल्या असतील, तर ब्राह्मण समाजातल्या काही लोकांनी त्यांना विरोधही केला आहे.
पण असे न म्हणता सरसकट ब्राह्मणांनी पापक्षालन करण्याचे विधान त्यांनी केले.

आपला संताप व्यक्त करताना आनंद दवे म्हणाले, मोहन भागवतांनीच पापक्षालन करण्याची गरज आहे.
इथला हिंदू नराधमांच्या हातात देण्याचे पाप तुम्ही करण्याचा विचार करत आहात. तुम्ही पापक्षालन केले पाहिजे. तुम्ही देशात जातीयवाद वाढवत आहात.

 

Web Title :- Mohan Bhagwat | brahman mahasangh targets rss chief mohan bhagwat cast system statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | आई-वडिलांना शिव्या देण्याच्या वक्तव्यावरून अजित पवारांनी घेतला चंद्रकांत पाटलांचा समाचार

Pune Crime | दुभाजकाला धडकून १७ वर्षाच्या मुलाचा मृत्यु; बाणेर परीसरातील घटना

Rain in Maharashtra | उद्या पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘येलो’ अलर्ट, 11 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पावसाचा हाहाकार