नामांकित शाळेच्या संस्थापकाकडून विनयभंग

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

चिंचवड परिसरात एका नामांकित असलेल्या  शाळेच्या संस्थापकाकडून कमर्चारी महिलेचा विनयभंग करण्यात आल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 20 जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

[amazon_link asins=’B014PHNO2Y’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3afde5e7-9481-11e8-8f1d-4166cf7e37b1′]

याप्रकरणी संबंधीत पीड़ित महिलेने स्थानिक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर संस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार त्यासंस्थापकाने पीडित महिलेस कामनिमित्त त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतले आणि त्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केला, असे तक्रारीत म्हटले असून पोलीस तपास करत आहेत.

शहरात यपूर्वीही शाळा, महाविद्यालयात महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, शारीरिक सुखाची मागणी करण्यात आल्याचे गुन्हे दाखल झालेले आहेत, मात्र तपासात यातील सत्यताबाहेर आली. तपास पोलीस करत आहेत.