काकांच्या घरात अभ्यासाठी गेलेल्या तरुणीचा घरात घूसून विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – काकांच्या घरी अभ्यासासाठी गेलेली तरुणी एकटी असल्याचे पाहून अनोळखी व्यक्तीने घरात घूसून तरुणीचा विनयभंग करत मारहाण केली. त्यानंतर घरातील कपाटातील रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर तिच्याशी अश्लील चाळे करत असल्याने तिने आरडा ओरडा केल्यानंतर तो पसार झाला. हा प्रकार वारजे येथे एनडीए रोड परिसरातील एका सोसायटीत रविवारी घडला.

याप्रकरणी १९ वर्षीय तरुणीने वारजे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही बारावी इय़त्तेत शिक्षण घेते. तिच्या वारजे येथील घरी धार्मिक विधी करण्याचा कार्यक्रम रविवारी होता. त्यावेळी तिला अभ्यास करायचा असल्याने ती वारजे परिसरातच राहणाऱ्या तिच्या काकाच्या घरी अभ्यासासाठी गेली. तिचे काका तिच्या घरी कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी तिने दार उघडले आणि आत जाऊन दरवाजा लावत असतानाच एक अनोळखी व्यक्ती तिच्या घरात घुसला. त्याने तिला जीवे मारण्याची धमकी देत मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर घरातील कपाटातील ड्रावर उघडून पैसे काढून घेतले आणि तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणीने आरडाओऱडा केला. त्यामुळे तो पळून गेला. त्यानंतर तिने खिडकीतून पाहिल्यानंतर तो दुचाकी घेऊन तेथून पळाला. तरुणीला हा धक्का बसला होता. त्यामुळे तिने यासंदर्भात उशीरा तक्रार दिली असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. निकम हे करत आहेत.