धक्कादायक ! मंत्रालयातील महिला अधिकाऱ्याचा विनयभंग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतातील महिलांवर अत्याचार नवीन नाहीत. भारतात मोठ्या प्रमाणावर महिला आणि मुलींवर अत्याचार होत असतात. मात्र सरकारी कार्यालयांमध्ये देखील महिला सुरक्षित राहिल्या नसल्याचे अनेक उदाहरणांमधून समोर येत आहे. अशाच प्रकारची एक घटना मुंबईमध्ये घडली आहे. मंत्रालयातील एका उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावरून हा आरोपी या महिलेला त्रास देत होता. याप्रकरणी पोलिसांनी पुण्यातून या आरोपीला अटक केली असून पुढील चौकशी करत आहे. शरीफ गफार खान असे आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आरोपी अनेक दिवस या अधिकारी महिलेला सोशल मीडियावर फॉलो करत होता. यामध्ये त्याने अनेकदा या महिला अधिकाऱ्याचा विनयभंग देखील केला होता. मात्र हे सहन न करण्यापलीकडे गेल्यानंतर त्यांनी या व्यक्तीची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.

त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत त्याला पुण्यातून अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी सर्व तांत्रिक बाजू तपासून मुंबईच्या सायबर पोलिसांनी त्याला अटक केली होती.

दम्याच्या रुग्णांनी घ्यावी ‘ही’ काळजी, अन्यथा वाढू शकतो त्रास

लाल फळे आरोग्याला फायदेशीर, नियमित करा सेवन

ताकाच्या नियमित सेवनाने वाढते रोगप्रतिकारक शक्ति

डोळ्यांवरून समजू शकते; तुमचे आरोग्य कसे आहे

मराठा आरक्षण : राज्यामध्ये मिळाले आता केंद्राच्या नोकऱ्यांमध्येही लागू झाले पाहिजे : आमदार हर्षवर्धन जाधव

माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्यास विश्वास नांगरे पाटील आणि CM देवेंद्र फडणवीस जबाबदार – गुणरत्न सदावर्तें यांचा गौप्यस्फोट