Money Laundering Case | अनिल देशमुखांना किंचीत दिलासा; सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाला दिले ‘हे’ निर्देश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Money Laundering Case | शंभर कोटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या (Money Laundering Case) आरोपानंतर राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अटक करण्यात आली. गेले काही दिवस झाले ते न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, आता त्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) मुंबई हाय कोर्टाला (Mumbai High Court) देण्यात आले आहेत.

 

अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत म्हटले होते की, 25 मार्च रोजी त्यांच्या वतीने मुंबई हाय कोर्टात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता, ज्याची सुनावणी होत नाहीये. यावर आज सुप्रीम कोर्टाने आदेश जारी करत हाय कोर्टाला या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी घेण्यास सांगितले आहे. मुंबई उच्च न्यायालय अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज जलदगतीने निकाली काढेल अशी आम्हाला आशा आहे. असं सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर अनिल देशमुखांना हाय कोर्टात अर्ज करण्यास मुभा देण्यात आली आहे. (Money Laundering Case)

 

”अनिल देशमुख हे 73 वर्षांचे आजारी वृद्ध आहेत. शिवाय त्यांना अनेक प्रकारचे आजारही आहेत.
त्यामुळे त्याचा जामीन अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्यात यावा व त्यांचा संवेदनशीलपणे आणि सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा.” असा युक्तिवाद अनिल देशमुख यांचे वकील कपिल सिब्बल (Lawyer Kapil Sibal) यांनी केला आहे.

 

Web Title :- Money Laundering Case | anil deshmukhs bail application to be heard soon supreme court orders mumbai bombay high court

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा