Monsoon And Covid | ‘कोरोना’ आणि ‘मान्सून’संबंधी आजार कसे ओळखाल? जाणून घ्या तज्ज्ञांचं म्हणणं

नवी दिल्ली : Monsoon And Covid | देशात अजूनही कोरोना व्हायरससोबतचे (Coronavirus) युद्ध सुरूच आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने एक्सपर्टने म्हटले आहे की, मान्सूनमध्ये होणार्‍या काही आजारांची लक्षणे कोविड-19 च्या लक्षणांसमान आहेत. अशाप्रकारे ही लक्षणे लोकांमध्ये संभ्रम (Monsoon And Covid) निर्माण करता. हे दोन वेगवेगळे आजार शरीराला कसे प्रभावित करतात आणि त्यांच्या कोणत्या बाजू समान आहेत जाणून घेवूयात…

मान्सूनमध्ये होणारे आजार

डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया, कॉमन कोल्ड, वायरल ताप. तसेच वॉटर बॉर्न आजार जसे की कॉलरा, टायफाईडचा समावेश आहे.

कोरोनाचा परिणाम

कोरोना व्हायरस संसर्ग व्यक्तीच्या रेस्पिरेट्री ट्रॅक्टवर हल्ला करतो. यामुळे रूग्णांना फुफ्फुसाशी संबंधीत समस्या होऊ लागतात. याच्या सामान्य लक्षणात खोकला, घशात खवयव, वास आणि चव जाणे, श्वास घेण्यास त्रास, आणि फुफ्फुसाची क्षमता इत्यादीचा समावेश आहे.

कोरोना आणि मान्सून आजारातील समानता

वेक्टर बॉर्न आजारात नेहमी जास्त ताप, थकवा, सांधेदुखी आणि मासपेशींमध्ये वेदना होतात, जी कोविडच्या लक्षणांप्रमाणे आहेत. कोविड-19 आणि कॉमन कोल्ड दोन्ही श्वासाशी संबंधीत आजार आहेत. यांची लक्षणे बर्‍यापैकी जुळतात. घशात खवखव, खोकला, ताप, शरीरात वेदना, कंजेक्शन इत्यादी लक्षणांचा समावेश आहे.

वायरल ताप, टायफाईड आणि कॉलरा इत्यादीमध्ये सुद्धा ताप, मांसपेशी आणि सांधेदुखी होते, थकवा आणि कमजोरी, थंडी लागणे, चक्कर येणे, घाम, डिहायड्रेशन, कमजोरी आणि भूक न लागणे अशी लक्षणे दिसतात जी कोविड रूग्णामध्ये असे शकतात. कॉमन कोल्ड अचानक होतो आणि याची लक्षणे हळुहळु दूर होतात, परंतु कोविडची लक्षणे हळुहळु उत्पन्न होतात आणि खुप दिवस राहतात. एक्सपर्टनुसार शरीरात अशी लक्षणे दिसल्या ताबडतोब टेस्ट करून घ्यावी.

हे देखील वाचा

IMD Alert | अरबी समुद्रात वेगाने वारे वाहण्याची शक्यता, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार

Gold Price Today | 7 हजारपर्यंत ‘स्वस्त’ मिळतंय सोनं, आता खरेदी केल्यास मिळेल मोठा फायदा; एक्सपर्ट देताहेत सल्ला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Monsoon And Covid | difference between monsoon and covid symptoms steps of prevention

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update