Monsoon 2021 : मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन, कोकणासह सोलापूरपर्यंत मारली मजल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केरळमध्ये (Kerala) 3 जून रोजी आगमन झाल्यानंतर मान्सूनने  गेल्या दोन दिवसांत वेगवान प्रवास (monsoon express) करीत महाराष्ट्रात (Maharashtra) प्रवेश केला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या अरबी समुद्रातील शाखेने जोरदार मुसंडी मारली आहे. दक्षिण कोकणातील (South Konkan) हर्णेपासून सोलापूरपर्यंत (Solapur) मान्सूनचे आगमन झाले असल्याचे, हवामान विभागाने जाहीर केलं आहे.

मुख्यमंत्री ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले – ‘…तोपर्यंत ही महाविकास आघाडी टिकणार’

मान्सूनमध्ये आणखी प्रगती
तीन जून रोजी केरळमध्ये आगमन झाल्यानंतर मान्सूनने शुक्रवारपर्यंत कर्नाटकातील (Karnataka) कारवारपर्यंत वेगवान (monsoon express) वाटचाल केली.
आज त्यामध्ये आणखी प्रगती झाली आहे.
मान्सूनने गोव्यासह (GOA) कोकणातील हर्णे तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर व लगतच्या मराठवाड्यातील काही भागापर्यंत मजल मारली आहे.

यंदा मान्सूनचे लवकर आगमन
हवामान विभागाने जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार दक्षिण कोकणात 7 जून, कोल्हापूरमध्ये 9 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होत असते.
परंतु यंदाच्या वर्षी मान्सूने वेळेच्या आधीच महाराष्ट्रात आगमन केले आहे.
गेल्या काही वर्षात मान्सूनचे इतक्या लवकर महाराष्ट्रात आगमन होण्याचे ही पहिलीच वेळ आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडेचे रोखठोक उत्तर, म्हणाल्या – ‘धनंजयच्या खासगी प्रकरणाचे समर्थन करणार नाही, पण…’

 

Good News : मान्सून महाराष्ट्रात दाखल, हवामान खात्याची माहिती
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दोन दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने (Monsoon) संपूर्ण केरळ व्यापला आहे. गुरुवारी सकाळपासून केरळमध्ये (Kerala) जोरदार पावसाला सुरुवात झाली. केरळमध्ये मान्सून दाखल (Monsoon arrives) झाल्यानंतर काही तासांतच नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी कर्नाटकच्या  दिशेने आगेकूच केली. कर्नाटकच्या (Karnataka) किनारपट्टीचा बहुतांश भागात मान्सून दाखल (Monsoon arrives) झाला. त्यानंतर मान्सून आज (शनिवार) महाराष्ट्रात दाखल झाला असून मान्सूनच्या पुढच्या वाटचालीला परिस्थिती अनुकुल आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामान weather  तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

 

या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
पुढील 2 ते 3 दिवसांत मान्सून अरबी समुद्रातील काही भाग व्यापेल. याशिवाय पुढील 2 ते 3 दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये रायगड, ठाणे, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांना हवामान  खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.