Monsoon League Cricket Tournament 2023 | तिसरी ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; बिझनेस प्रोफेशनल्स् क्रिकेट क्लब संघाला विजेतेपद !!

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Monsoon League Cricket Tournament 2023 | एजीएएस मॅनेजमेंट तर्फे कै. अपर्णा चंद्रशेखर ओक यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित तिसर्‍या ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत (Monsoon League Cricket Tournament 2023) गिरीष ओक याच्या कामगिरीच्या जोरावर बिझनेस प्रोफेशनल्स् क्रिकेट क्लब संघाने एचआरकॅपिटा सोल्युशन्स् संघाचा ६ गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.

मुकूंदनगर येथील कटारीया हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात
बिझनेस प्रोफेशनल्स् क्रिकेट क्लबच्या कर्णधार आदित्य पाळंदे याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
जलदगती गोलंदाज गिरीष ओक याने २६ धावात ३ गडी बाद करून कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवला.
या भेदक गोलंदाजीमुळे एचआरकॅपिटा सोल्युशन्स्ने १४६ धावांचे आव्हान उभे केले.
प्रफुल्ल मानकर याने कर्णधाराला साजेशी खेळी करताना ६८ धावा जमविल्या. बिझनेस प्रोफेशनल्स् क्रिकेट क्लबने
१६.५ षटकात व ४ गडी गमावून पूर्ण केले. शंतनु आठवले याने ५२ धावांची तर, सुयश भट याने नाबाद ३९ धावा आणि
गिरीष कोंडे याने ३६ धावांची खेळी करून संघाला विजेतेपद मिळवून दिले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे संचालक आदित्य पाळंदे, अमित उमरीकर, गिरीष ओक आणि शंतनु आठवले
यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान अभिमन्यु ढमढेरे, सर्वोत्कृष्ट फलंदाज भावेश पाटील,
सर्वोत्कृष्ट गोलंदाज गौरव उपाध्याय आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मान यश तौसाळकर यांना देण्यात आला. (Monsoon League Cricket Tournament 2023)

सामन्याचा संक्षिप्त निकालः अंतिम सामनाः
एचआरकॅपिटा सोल्युशन्स्ः २० षटकात ६ गडी बाद १४६ धावा (प्रफुल्ल मानकर ६८ (५६, ६ चौकार, २ षटकार),
अभिमन्यु ढमढेरे २०, रोहीत ननावरे २१, गिरीष ओक ३-२६, अमित गणपुले २-२४) पराभूत वि. बिझनेस प्रोफेशनल्स्
क्रिकेट क्लबः १६.५ षटकात ४ गडी बाद १५० धावा (शंतनु आठवले ५२, सुयश भट नाबाद ३९, गिरीष कोंडे ३६,
अभिमन्यु ढमढेरे २-२१); सामनावीरः गिरीष ओक;

स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकेः
सर्वोत्कृष्ट फलंदाजः भावेश पाटील (युनायटेड इलेव्हन, ३०० धावा);
(Best Bowler) सर्वोत्कृष्ट गोलंदाजः गौरव उपाध्याय (ट्रोजन्स् क्रिकेट क्लब, १८ विकेट);
सर्वोत्कृष्ट खेळाडूः अभिमन्यु ढमढेरे (१९८ धावा, १२ विकेट);
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकः यश तौसाळकर (ट्रोजन्स् क्रिकेट क्लब);

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar On Chandrashekhar Bawankule | ‘जे अशी भूमिका घेतात, त्यांच्याबद्दल…’, बावनकुळेंच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Pune Metro – Chandrakant Patil | गणपती विसर्जनावेळी पुणेकरांचा मेट्रोला अभूतपूर्व प्रतिसादाला सलाम ! अनंत चतुर्दशीला दीड लाखापेक्षा जास्त पुणेकरांचा मेट्रोने प्रवास

Pune Ganeshotsav 2023 | बाप्पाला निरोप देताना कुटुंबाचं मुलाकडं दुर्लक्ष, चार वर्षाच्या चिमुकल्यानं घेतला अखेरचा निरोप; मायलेकरांचा ‘तो’ सेल्फी ठरला अखेरचा, पिंपरी-चिंचवड परिसरातील घटना

MNS Chief Raj Thackeray | ‘…तर गालावर वळ उठतील हे निश्चित’, मुलुंड प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा; सरकारलाही धरले धारेवर