मासिक पाळीदरम्यान या कारणांमुळे स्रियांचा मूड बदलतो.

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मासिक पाळीच्या आधी काही दिवस स्रियांची कोणत्याही कारणावरून चिडचिड होते. कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. शरीर अगदी कंटाळवाणे होते. कोणाशी बोलू वाटत नाही. हे जर एखाद्या स्त्रीसोबत होत असेल तर असे समजा कि तुम्हाला ८ दिवसात पाळी येणार आहे. स्रिया नेमकं असं का करतात हे कळायला काही मार्ग नसतो. या कारणामुळे स्रियांना अनेकदा चुकीचं ठरवलं जात. पण पाळी येण्यापूर्वी किंवा पाळी दरम्यान स्रिया असं का करतात ते जाणून घ्या.

मासिक पाळी यायच्या अगोदर प्रत्येक स्त्री ही प्री-मेन्सट्रूअल सिंड्रोमला सामोरी जात असते. म्हणून त्यांची एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही कि लगे चिडचिड होते. स्रियांचा कधीपण कशाचाही मूड होतो. किंवा कशाचाच मूड होत नाही. त्यांना कोणाशी बोलावं वाटत नाही.एकट बसावं वाटतं. कोणतंही काम करायला उत्साह वाटत नाही. कारण प्री-मेन्सट्रूअल डिस्फोरिक डिसऑर्डर म्हणजे प्रिमेन्सट्रूअल सिंड्रोमचं रूप.

मासिक पाळी येणाच्या काही दिवस अगोदर स्रियांच्या शरीरातील हार्मोन्सचं प्रमाण कमी जास्त होत असतं. हार्मोन्सचं प्रमाण कमी-जास्त झाल्यामुळे मनाचं संतुलन ढासळत. आणि स्रिया चिडचिड करू लागतात.

मासिक पाळी येण्याच्या अगोदर ८ दिवस स्त्रीयांमध्ये हे बदल जाणवतात. आणि हे बदल सर्वच स्त्रीयांमध्ये जाणवत नाहीत. कारण हे फक्त ताण-तणाव, कष्टाचे काम, अनुवंशिकता, वेळेवर जेवण न करणे यामुळे जाणवतात. त्यामुळे हे बदल सर्व स्त्रीयांमध्ये होत नाहीत. त्यामुळे अशा अवस्थेत स्रियांच्या बदलत्या मूडला चुकीचं न ठरवता त्यांना समजून घेणं आणि त्यांच्या आहाराची आणि आरोग्याची काळजी घेणं हि महत्वाचं आहे.

फेसबुक पेज लाईक करा