Morning Routine For Digestion | सकाळच्या ‘या’ सवयींमुळे तुमचे पोट नेहमी राहील स्वच्छ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Morning Routine For Digestion | पचनासाठी सकाळची दिनचर्या (Morning Routine For Digestion) खूप महत्वाची असते. कारण सकाळीच दिवस सुरू होतो. जर सकाळ चांगली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो. यासाठी शरीरासाठी सकाळच्या चांगल्या सवयी लावणे फार महत्वाचे आहे.

अनेकांना सकाळी पोट साफ न होण्याची समस्या असते. ज्यामुळे ते दिवसभर अस्वस्थ राहतात. पोटाच्या आरोग्यासाठी काही चांगल्या सवयी अवलंबणे आवश्यक आहे. या सवयींच्या मदतीने पोटाची समस्या कायमची दूर होते. या सवयी कोणत्या ते जाणून घेऊया या. (Morning Routine For Digestion)

१. कोमट पाण्याने करा दिवसाची सुरुवात :

सेलिब्रिटी त्यांच्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करतात असे अनेकदा ऐकले असेल. कोमट पाण्याचे सेवन केल्याने पचनक्रिया बरोबर राहते. यासोबतच मेटाबॉलिज्म वाढतो. पोट सहज साफ होते. कोमट पाण्यात लिंबाचा रस, मध, दालचिनी किंवा तुळशीची पाने यासारख्या पौष्टिक गोष्टी घालू शकता.

२. उठल्यानंतर चहा किंवा कॉफी पिऊ नका :

अनेकांना सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी प्यायला आवडते. यामुळे ताजेतवाने होता असे वाटते, पण तसे नाही. कधीही रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिऊ नका. कारण त्यामुळे गॅस आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो.

३. व्यायाम करणे आवश्यक :

सकाळच्या दिनचर्येत व्यायाम आणि योगासनांचा समावेश करा. दररोज किमान १० मिनिटे मेडिटेशन, योगा किंवा व्यायाम करा. यामुळे आरोग्य सुधारते. कॅलरी बर्न होतात. पोट स्वच्छ राहते. (Morning Routine For Digestion)

४. नाश्त्यावर लक्ष केंद्रित करा :

दिवसभराच्या जेवणात सकाळचा नाश्ता खूप महत्त्वाचा असतो. नाश्ता चुकवू नका. पौष्टिक नाश्ता करा.
सकाळच्या नाश्त्यात तळलेले भाजलेले किंवा मैदा खाऊ नये. डाएटमध्ये व्हिटॅमिन, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा समावेश करा. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहील.

५. सकाळी लक्षात ठेवा या गोष्टी :

सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरू नका. कारण त्यामुळे बाकीच्या कामांना उशीर होतो.
रात्री लवकर झोपा आणि ७-८ तासांची झोप घ्या. पुरेशी झोप घेतल्याने पोट निरोगी राहते.
रात्री उशिरा जेवण करू नका. जेवल्यानंतर लगेच झोपू नका.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Artificial Colors On Vegetables | हिरव्या भाज्यांच्या नादात विष तर खरेदी करत नाही ना?
बाजारात जाण्यापूर्वी आवश्य वाचा ही बातमी, अन्यथा पडू शकता आजारी

Ghinghru Fruit | अनेक औषधी गुणांचे भांडार हे दुर्मिळ फळ, केवळ ३ महिने मिळते बाजारात,
५ फायदे जाणून घेतल्यास शोधत राहाल