62 वर्षांत सर्वांत ‘हॉट’ ठरला जानेवारी, दक्षिण भारतात 121 वर्षांचा ‘रेकॉर्ड ब्रेक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण भारतात 121 वर्षांत जानेवारी महिना सर्वांत उष्ण ठरला आहे. या महिन्यात तापमान 22.33 डिग्री सेल्सिअस होते. तर 1919 मध्ये 22.14 डिग्री सेल्सिअस आणि 2020 मध्ये 21.93 डिग्री सेल्सिअस होते. आता हाच रेकॉर्ड तोडत नवा रेकॉर्ड तयार झाला आहे.

भारतात जानेवारी महिना सर्वांत उष्ण महिना ठरला आहे. याबाबत भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितले, की देशात 2021 या वर्षांतील जानेवारी महिन्यात नोंद करण्यात आलेल्या किमान तापमानाने मागील 62 वर्षांच्या तापमानाचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. जानेवारी महिना गेल्या 62 वर्षांतील सर्वांत उष्ण महिना ठरला आहे. देशातील दक्षिणेकडील भाग सर्वांत उष्ण राहिला आहे.

दक्षिण भारतात हा महिना 121 वर्षांतील सर्वात उष्ण राहिला असून, त्याचे तापमान 22.33 डिग्री सेल्सिअस राहिले आहे. मध्य भारतात 1982 नंतर 38 वर्षांत सर्वात उष्ण राहिले आहे. तर 1901 पासून 2021 दरम्यान 15.06 डिग्री सेल्सिअससह 1958 सर्वांत उष्ण राहिला आहे.

IMD ने सांगितले, की 1958 नंतर 62 वर्षांमध्ये जानेवारी 2021 हा महिना सर्वांत उष्ण राहिला आहे. 1 जानेवारीला 1.1 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. हे तापमान 15 वर्षांत जानेवारी महिन्यातील सर्वात कमी तापमान होते.

7 दिवस थंडीची लाट
IMD च्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात 7 दिवस थंडीची लाट आली होती. 2008 नंतर याच महिन्यात ही लाट आली. जेव्हा सखल भागाचे किमान तापमान 2 डिग्री किंवा त्यापेक्षा कमी गेले तेव्हा थंडीची लाट येण्याची स्थिती निर्माण होते.