धक्कादायक ! 2 मुलांना गळफास देऊन आईने केली आत्महत्या

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – पोटच्या दोन लेकरांना गळफास देऊन आईने स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओरा साहू, आयुष साहू आणि सविता साहू अशी मृतांची नावे आहेत. ही गंभीर घटना वर्धा जिल्ह्यात भूगावमध्ये शुक्रवारी घडली.

उत्तम गल्वा येथील एका कंपनीत आशिष साहू नोकरी करतात. त्यांच्या पत्नीने साविताने आधी मुलांना गळफास देऊन त्यानंतर स्वत: देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी लगेचच या घटनेचा तपास सुरु केला, परंतू त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या का केली याची माहिती अजून समोर आली नाही.

मागील काही दिवसांपूर्वी देखील अशीच घटना समोर आली होती. पारनेर तालुक्यात आई, वडिलांसह दोन मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. सकाळी बढे कुटूंब शेजारच्यांना न दिसल्याने त्यांनी घरात डोकवल्यावर नवरा-बायको आणि दोन्ही मुलांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –