दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, कठुआ प्रकरणातील पीडितेच्या आईची मागणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कठुआ सामुहिक बलात्कार प्रकरणी 7 मधील 6  आरोपींनी दोषी ठरवण्यात आले आहे. आता त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. त्याचा निर्णय दुपारी येईल, परंतू त्याआधीच पीडितेच्या आईने आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. घटनेला इतके दिवस झाले तरी अजून आरोपींना शिक्षा न झाल्याने पीडितेच्या आईने खंत व्यक्त केली आहे.

10 जानेवारी 2018 साली जम्मू काश्मीरमध्ये कठुआमध्ये 8 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना समोर आली होती. या घटनेनंतर संपुर्ण देशात रोषाचे वातावरण होते. या घटनेला संपुर्ण मिडियाने उचलून धरले होते. त्या पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी देशभरातील लोकांनी ठिकठिकाणी कैंडल मार्च काढला. परंतू घटनेला दीड वर्ष होऊन गेले तरी न्याय मिळत नसल्याने पीडितेच्या नातेवाईकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

त्यानंतर आता दीड वर्षांनंतर या प्रकरणाचा निर्णय झाला आहे. ज्या 6  आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते त्यात ग्रामप्रधान सांजी राम हा मुख्य आरोपी होता. तसेच दिपक खजुरिया, परवेश दोषी, तिलक राज, आनंद दत्ता, सुरेंद्र कुमार यांचा समावेश होता. तर यात आरोपी असलेल्या विशाल या सांजी राम याच्या मुलाला निर्दोष सोडण्यात आले आहे. सुरुवातीला ह्या प्रकरणी जम्मू न्यायालयात सुनावणी करण्यात येणार होती परंतू नंतर पठानकोट न्यायालयात या प्रकरणी सुनावणी करण्यात आली तेथूनच हा निर्णय देण्यात आला.

या प्रकरणी शिक्षा दोषी ठरवण्यात आलेल्या दोषींना काय शिक्षा सुनावणार यावर निर्णय झालेला नाही. याबाबतचा निर्णय आज दुपार पर्यत येईल.परंतू त्याआधी पीडित मुलीच्या आईकडून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे.  

आरोग्य विषयक वृत्त – 

केसांसह त्वचेसाठीही आवळा गुणकारी ; रसाने त्वचा होईल गोरी

गर्भपिशवी काढावी की काढू नये ? काही समज-गैरसमज

छातीत जळजळ होत असल्यास दुर्लक्ष करू नका ; गंभीर आजाराचा संकेत

शाळांमध्ये लागणार तंबाखूविरोधी फलक