Motor Vehicles Act | जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीचे बदलले नियम, विकताच मालकाचे नाव रजिस्ट्रेशनमधून काढले जाणार

नवी दिल्ली : Motor Vehicles Act | रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जुन्या वाहनांच्या विक्रीशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. जुन्या वाहनांची विक्री करणाऱ्या कंपन्या आणि डीलर्सना नव्या नियमांचा जितका फायदा होईल, तितकाच फायदा वाहनांची विक्री करणाऱ्या सर्वसामान्यांनाही होणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंबंधीचे नियम बनवून लागू केले आहेत. (Motor Vehicles Act)

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जुन्या वाहनांच्या विक्रीशी संबंधित नियम बदलून कार डीलर्स आणि कंपन्यांना जबाबदार ठरवले आहे. नवीन आदेशानंतर, केवळ आरटीओ नोंदणीकृत डीलर्सनाच कार विकणे आणि खरेदी करण्यासाठी अधिकृत असतील. प्री-ओन्ड कार मार्केटमध्ये पारदर्शकता आणणे आणि सामान्य लोकांचे फसवणुकीपासून वाचवण्यासाठी नवीन नियम करण्यात आले आहेत.

ट्रान्सफरमधील अडथळे, थर्ड पाटीसंबंधी दायित्वांशी संबंधित विवाद, डिफॉल्टर ठरवण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आता केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या प्रकरण III मध्ये सुधारणा केली आहे, जेणेकरून प्री-ओन्ड कार बाजारासाठी नियामक इको-प्रणाली निर्माण करता येईल. (Motor Vehicles Act)

अशाप्रकारे होईल सर्वसामान्यांना फायदा

याबाबत ट्रान्सपोर्ट एक्सपोर्ट गुरमीत सिंग तनेजा यांनी सांगितले की, सध्या कंपन्या किंवा कार डीलर वाहन विक्री केल्यानंतर वाहन हस्तांतरणासाठी कोऱ्या फॉर्मवर स्वाक्षरी घेतात. यानंतर ही कार कोणाला विकली जाते आणि जोपर्यंत ती विकली जात नाही, तोपर्यंत ती कोण वापरतो, याबाबत वाहन मालकाला काहीच समजत नाही. मात्र नवीन नियमानुसार वाहन विक्री केल्यानंतर डीलर किंवा कंपनी ऑनलाइन वाहन आपल्या नावावर करेल. म्हणजे आता वाहनाची विक्री होताच मालकाची कोणतीही जबाबदारी राहणार नाही

नियमातील प्रमुख तरतुदी अशाप्रकारे

– डिलर्सची सत्यता पडताळण्यासाठी नोंदणीकृत वाहनांच्या डीलर्ससाठी ऑथेंटिकेशन लागू केले आहे.

– नोंदणीकृत वाहन मालक आणि डीलर्स यांच्यातील वाहनांच्या पुरवठ्याच्या माहितीसाठी प्रक्रियेचा खुलासा करण्यात आला आहे.

– नोंदणीकृत वाहने आपल्याकडे ठेवण्याबाबत डीलर्सचे अधिकार आणि कर्तव्येही स्पष्ट करण्यात आली आहेत.

– डिलर्सला हा अधिकार देण्यात आला आहे की, ते आपल्या ताब्यातील वाहनांची नोंदणी प्रमाणपत्र / वाहन फिटनेस प्रमाणपत्राचे नूतनीकरण, नोंदणी प्रमाणपत्राची सत्य प्रत, एनओसी, मालकी हस्तांतरणासाठी अर्ज करू शकतात.

– नियामक उपाय म्हणून, इलेक्ट्रॉनिक वाहनांचे देखभालसंबंधी ट्रिप रजिस्टर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे,
ज्यामध्ये वाहन वापराचा संपूर्ण तपशील द्यावा लागेल. यामध्ये गंतव्यस्थान, जाण्याचे कारण, ड्रायव्हर, मायलेज, वेळ आदींची संपूर्ण माहिती द्यावी लागेल.

– हे नियम नोंदणीकृत वाहनांचे डीलर्स / मध्यस्थांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना अधिकार देण्यास
उपयुक्त ठरतील. यासोबतच या वाहनांच्या खरेदी-विक्रीच्या संदर्भात होणारी फसवणूक रोखता येईल.

Web Title :-  Motor Vehicles Act | road transport and highways ministry issued gazette for sale and purchase old vehicles

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | अनिल देशमुख यांच्या सुटकेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले- ‘या प्रकरणचं सत्य…’

Shivsena Shinde Group | मुंबई महापालिकेत राडा, पालिकेतील सेनेच्या कार्यालयावर शिंदे गटाचा दावा; नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी (VIDEO)