MP Amol Kolhe | दोन्ही डोस घेतल्यानंतरही खा. डॉ.अमोल कोल्हे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचे दोन डोस (Corona Vaccine) घेतल्यानंतरही राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांना कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी ट्विट करुन दिली आहे. त्यांना ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा RT-PCR रिपोर्ट पॉझिटिव्ह (Report positive) आला आहे. परंतु प्रकृती स्थिर आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांचे मतदारसंघातील पूर्वनियोजित सर्व दौरे आणि कार्यक्रम पुढे ढकलल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार (Medical treatment) सुरु केले आहेत. मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा, सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करुन घ्यावी. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारित नियमांचे काटेकोर पालन करावे.

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘नमो’ मंदिराबाबत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी, म्हणाले – ‘पुणेकरांनी नाव ठेवण्यात देवांनाही सोडलं नाही’

Parambir Singh | परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यातील गुन्हाही सीआयडीकडे?

Honey Trap Racket Pune | ‘हनी ट्रॅप’ करणार्‍या तरुणीने मांजरीतील तरुणालाही 20 लाखांना लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघड


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  mp amol kolhe tested covid 19 positive

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update