MP Anil Bhonde | भास्कर जाधव नाही तो बाष्पळ जाधव आहे, खासदार अनिल भोंडेचा खोचक टोला

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – कुडाळ तालुक्यात मंगळवारी आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांच्यावर होणाऱ्या लाचलुचपत (Anti Corruption Bureau) कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थनार्थ शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Shivsena Thackeray Group) मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाषण ठोकले होते. त्यांनी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि अन्य नेत्यांवर टीका केली होती. त्यावर आता भाजपचे राज्यसभा खासदार अनिल भोंडे (MP Anil Bhonde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भास्कर जाधवांचे नाव बदलून आता बाष्पळ जाधव केले पाहिजे, असे अनिल भोंडे (MP Anil Bhonde) म्हणाले.

ते भास्कर जाधव नसून बाष्पळ जाधव आहेत. त्यांचे नाव बदलून बाष्पळ जाधव केले पाहिजे. त्यांच्या जीभेला ताळतंत्र राहिले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून (PM Narendra Modi) ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यापर्यंत ते कोणावरही टीका करतात, त्यांच्या नकला करतात. त्यामुळे त्याचे परिणाम ते भोगत आहेत. टीका केल्यानंतर त्यांना मानणारे जे लोक आहेत, ते चिडतात आणि प्रतिक्रिया देतात. नकला केल्यामुळे त्यांना विधानसभेत देखील माफी मागावी लागली आहे. भास्कर जाधव स्वत: तरी कुठे धुतला तांदुळ आहे, ते देखील दहा पक्ष बदलून आलेले आहेत. त्यामुळे मी खरा शिवसैनिक आहे, असा दुसऱ्यांना शहाणपणा शिकविण्याचा भास्कर जाधवचा दावा आहे, त्यात काही तथ्य नाही, असे अनिल भोंडे (MP Anil Bhonde) म्हणाले.

भास्कर जाधव यांच्या भाषणानंतर आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) आणि भाजपच्या (BJP) चित्रा वाघ
यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते. जाधव यांनी नारायण राणेंना गेली अठरा वर्षे कोणी भाषणाला बोलावत नाही.
त्यांना आणि त्यांच्या मुलांना गल्ली बोळातील कुत्रं सुद्धा ओळखत नाही, असे म्हटले होते.
त्यावरून वाद चिघळला होता. काल रात्री (दि. 19) रोजी भास्कर जाधव यांच्या चिपळूण मधील घरावर हल्ला देखील झाला होता.

Web Title :- MP Anil Bhonde | Not Bhaskar Jadhav, he is Bashpal Jadhav, MP Anil Bhonde’s henchman

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा