खा.अनिल शिरोळे यांचे घुमजाव ; उपोषण स्थगित

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्याच्या पाणी प्रश्नावर आक्रमक होत उपोषण जाहीर करणाऱ्या खा.शिरोळे यांनी अचानक यू टर्न घेत उपोषण मागे घेतल्याचे आज सकाळी जाहीर केले.

त्यांचे उपोषण स्थगित झाल्याचा मेसेज शिरोळे यांच्या कार्यालयाकडून आज सकाळी व्हायरल करण्यात आला. याबाबत त्यांच्या स्वीय सचिवांशी संपर्क केला असता त्यांनीही या उपोषण स्थगितीच्या बातमीला दुजोरा दिला. महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्यासमवेत रविवारी पाणी प्रश्नावर बैठक होणार असल्याचे शिरोळे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

शिवाजीनगर भागात पाणीच न मिळाल्याने नागरिकांनी शिरोळे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्या आंदोलकांसमोर बोलताना शिरोळे यांनी उपोषणाची घोषणा केली होती. आपल्या घोषणेनंतर त्यांनी उपोषणाला परवानगी मिळावी यासाठी पोलीस खात्याकडे परवानगी मागितली होती.