MP Dr. Amol Kolhe | नथुराम गोडसेंच्या भूमिकेवरुन अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण; म्हणाले – ‘यात काहीही लपवण्याचं कारण नाही…,’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MP Dr. Amol Kolhe | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) खासदार डाॅ. अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) आता पहिल्यांदाच नथुराम गोडसेच्या भूमिकेत झळकले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. डॉ. अमोल कोल्हे हे एक कलाकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत ते यापूर्वीही झळकले आहेत. दरम्यान आता राजकीय दृष्ट्या वादग्रस्त ठरलेल्या नथुराम गोडसे यांची भूमिका अमोल कोल्हे साकारणार आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष आता या चित्रपटाकडे असणार आहे.

 

खासदार अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) यांच्या “Why I killed Gandhi” या चित्रपटाचा ट्रेल सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. अनेक सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर झाला आहे. त्यात, ते नथुराम गोडसेंच्या भूमिकेत दिसून येत आहेत. त्यावरुन आता राजकीय प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनी देखील अमोल कोल्हे यांच्या या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली आहे.

 

”अमोल कोल्हे यांनी गोडसेंची भूमिका टाळायला हवी होती. ज्या व्यक्तीने महात्मा गांधींचा खून केला ती भूमिका कशाला करायची? हे चूक आहे. भूमिका साकारताना ती किती छान भूमिका आहे तेही दाखवावं लागेल. अमोल कोल्हे कलाकार आहेत पण ते एका पक्षाचे खासदारही आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाची विचारधारा घेऊन चालायला हवं,” अशा शब्दात काँग्रेस नेते हुसेन दलवाई (Husain Dalwai) यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान अमोल कोल्हे यांनी येणाऱ्या प्रतिक्रियावर स्पष्टीकरण दिलं आहे.

”आपण जी भूमिका साकारतो त्यातील प्रत्येक भूमिकेशी आपली सहमती असते.
काही घटनांना शंभर टक्के वैचारिक सहमती असते तर काही भूमिकांशी सहमती नसते ही साधी आणि सोपी गोष्ट आहे.
2017 मध्ये या सिनेमात काम केले होते हा चित्रपट आता रिलीज होतोय.
या मधल्या काळात बऱ्याच घटना घडल्या. मी नथुराम गोडसेंच्या उदात्तीकरणाची भूमिका कधीच घेतलेली नाही.
कलाकार म्हणून मी या सिनेमात काम केले आहे. यात काहीही नाकारण्याचं किंवा लपवण्याचं कारण नाही असं मला प्रामाणिक वाटतं.
व्यक्ती म्हणून मला विचार स्वातंत्र्य आहे आणि कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. दोन्हीमध्ये गल्लत होऊ नये,” असं स्पष्टीकरण अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना सांगितलं आहे.

 

Web Title :- MP Dr. Amol Kolhe | there is no reason to hide anything ncp mp dr amol kolhe spoke clearly on the role of nathuram godse

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Indian Currency | 1, 5 आणि 10 रुपयांच्या ‘या’ नोटा तुमच्या घरी पाडतील पैशांचा पाऊस, जाणून घ्या कसा

 

Minimum Balance Post office | पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांच्या खात्यात किती असावा मिनिमम बॅलन्स? अन्यथा लागू शकते पेनल्टी; जाणून घ्या

 

Pune-Mumbai Express Highway Toll Plaza | अहो आर्श्चय ! पुणे-मुंबई एक्सप्रेस महामार्गावरुन दररोज 11 हजार वाहने टोल न देता बिनधास्त जातात