Pune-Mumbai Express Highway Toll Plaza | अहो आर्श्चय ! पुणे-मुंबई एक्सप्रेस महामार्गावरुन दररोज 11 हजार वाहने टोल न देता बिनधास्त जातात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune-Mumbai Express Highway Toll Plaza | प्रत्येक महामार्गावर टोल नाक्यावर वाहनांकडून टोल वसुली केली जाते. कोणत्याही वाहनाला टोल दिल्याशिवाय जाता येऊ नये यासाठी प्रत्येक टोलनाक्यावर तशी व्यवस्था केली जाते. मात्र, पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरुन (Pune-Mumbai Express Highway Toll Plaza) दररोज तब्बल 11 हजार वाहने टोन न देता जात असल्याचा दावा टोल वसुल करणाऱ्या कंपनीकडून करण्यात आला आहे. वाहन चालकाकडून टोल वसुल (Toll Collection) करण्यासाठी कंपनीकडून लोकांची नेमणूक केली जाते. त्यांच्याकडून टोल वसुली साठी सामान्य नागरिकांपासून ते आमदारांपर्यंत (MLA) हुज्जत घातल्याचे आणि मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहे. असे असताना कंपनीने केलेला हा दावा नक्की खरा आहे का याची चौकशी करावी अशी मागणी सजग नागरिक मंचाने (Sajag Nagrik Manch) केली आहे.

 

विकास महामंडळाच्या ताब्यातील सर्व टोलनाक्यांवरुन दररोज किती व कोणत्या प्रकारची वाहने जातात.
त्याची संख्या व टोलची रक्कम यांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार ही आकडेवारी प्रसिद्ध केली जात आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील डिसेंबर 2021 महिन्याची आकडेवारी राज्य रस्ते विकास महामंडळाने (State Road Development Corporation) नुकतीत प्रसिद्ध केली आहे.
त्यानुसार या महार्गावरुन दररोज 11 हजार वाहने टोल न देता जात असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. (Pune-Mumbai Express Highway Toll Plaza)

डिसेंबर 2021 या महिन्यामध्ये या मार्गावरुन तब्बल 3 लाख 30 हजार 797 वाहने टोल न भरताच निघून गेल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच सवलत आणि नियमभंग अशा दोन गटातील ही वाहने असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सवलतीची किती वाहने टोल न देता गेली याचा मात्र तपशील जाणीवपूर्वक देण्यात आलेला नाही.

 

यांना टोलमध्ये सवलत
प्रत्येक महामार्गावरील टोल नाक्यावर रुग्णवाहिका, पोलीस, मिलिटरी वाहन, आमदार, खासदार, न्यायाधीश यांच्या वाहनांकडून टोल घेतला जात नाही.
संपूर्ण डिसेंबर महिन्यात पुणे-मुंबई महामार्गावरुन 1850 बसेस, 5193 ट्रक, 5086 मल्टी एक्सल, 20 हजार 196 एलसीव्ही वाहने टोल न भरता निघून गेल्याचे दाखवण्यात आले आहे.

 

संकेतस्थळावरील माहिती संशयास्पद
सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Welankar) यांनी म्हटले की,
या महामार्गावरुन प्रवास करणारा कोणीही सांगू शकेल की येथील टोलनाका चुकवून कोणीही जाऊ शकत नाही.
असे असताना 3 लाख वाहनांनी टोल न भरता प्रवास केला, हे संशयास्पद वाटते.
कंत्राटदाराकडून आलेली आकडेवारी रस्ते विकास महामंडळाने संकेतस्थळावर प्रसिद्ध करताना याठिकाणच्या अधिकाऱ्यांना यामध्ये काहीच वावगे वाटत नाही हे आश्चर्यकारक असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांनी चौकशी करावी, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.

टोल नाक्यावर मोठा घोटाळा
विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे.
यामध्ये त्यांनी यापुढे सवलतीची वाहने आणि नियमभंग करुन गेलेली वाहने या दोन्ही गटाची आकडेवारी स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्याचे आदेश कंत्राटदाराला द्यावेत अशी मागणी केली आहे.
तसेच पुणे-मुंबई महामार्गावरुन डिसेंबर महिन्यात तब्बल 18 लाख 23 हजार 369 वाहने गेली असून त्यांनी 50 कोटी 61 लाख 78 हजार 629 रुपयांचा टोल भरला आहे. यावरुन हा किती मोठा घोटाळा आहे लक्षात येते.

 

Web Title :- Pune-Mumbai Express Highway Toll Plaza | Pune Mumbai Express Highway Toll Plaza daily 11 thousand vehicle no toll in route

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा