MP Girish Bapat | 3 टर्म नगरसेवक अन् 5 टर्म आमदार, भाजपसाठी ‘किंगमेकर’ असलेल्या गिरीश बापटांचा राजकीय प्रवास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि पुण्याच्या प्रत्येक निवडणुकीत ‘किंगमेकर’ची भूमिका बजावणारे खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांचे बुधवारी निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) त्यांनी आखेरचा श्वास घेतला. गिरीश बापट आणि पुणे असं एक समिकरण बनलं होतं. त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघाचे (Kasba Assembly Constituency) 30 वर्षे नेतृत्व केले. सध्या ते पुण्याचे खासदार होते. गिरीश बापट (MP Girish Bapat) यांच्या निधनामुळे भाजप ने पुण्यातील एक मोठा नेता गमावला आहे.

सर्वपक्षातील नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवणारा नेता अशी ओळख गिरीश बापट (MP Girish Bapat) यांची होती. गिरीश बापट 1995 पासून सलग पाच वेळा आमदार (MLA) म्हणून निवडून आले. त्यांनी नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1996 मध्ये भाजपच्या तिकीटावर त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी काँग्रेसचे सुरेश कलमाडी (Congress Suresh Kalmadi) यांनी त्यांचा पराभव केला होता.

बापट हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) स्वयंसेवक होते. जनसंघापासून ते जोडलेले होते. आधी नगरसेवक आणि त्यानंतर 1995 पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना खासदारकीचे तिकीट देण्यात आले. त्यात त्यांनी काँग्रेसचे मोहन जोशी (Mohan Joshi) यांचा पराभव केला.

गिरीश बापटांचा राजकीय प्रवास

गिरीश बापट यांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 रोजी पुण्यात झाला. त्यांनी तळेगाव दाभाडे ये प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण हे न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत (New English School Ramanbaug) पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली. 1973 ला त्यांनी टेल्को कंपनीत (Telco Company) नोकरी केली. दोन वर्षातच ते आणीबाणीमध्ये दीड वर्ष तुरुंगात गेले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी संघ परिवारामध्ये विविध पदांवर काम केले.

1983 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच पुणे महानगरपालिकेची निवडणूक
(Pune Municipal Corporation Election (PMC) लढवली आणि नगरसेवक म्हणून निवडून आले.
त्यानंतर ते तीन टर्म नगरसेवक म्हणून निवडून आले.
बापट यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने भाजपने 1995 मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली.
या निवडणुकीत ते निवडून आले आणि पुढे सलग पाच वेळा ते आमदार म्हणून निवडून आले.
2014 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला.
मात्र भाजपने अनिल शिरोळे (Anil Shirole) यांना संधी दिली. त्यानंतर 2019 निवडणुकीत बापटांना संधी
दिली आणि त्यांनी काँग्रेसचे मोहन जोशी यांचा 96 हजार मतांनी पराभव केला.

2014 मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे (Shiv Sena-BJP Alliance) सरकार आले.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाले. फडणवीसांच्या सरकारमध्ये गिरीश बापट यांची
कॅबिनेट मंत्री पदावर वर्णी लागली. ते पुण्याचे पालकमंत्री झाले.
मागील पाच वर्षापासून ते पुणे लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते.
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावत गेली. बापट यांची कसबा मतदारसंघावर मोठी पकड होती.
त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी हजेरी लावली होती.

Web Title :-  MP Girish Bapat | rss volunteer to mp the political journey of bjp leader girish bapat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

AFINDEX-23 | भारत- आफ्रिका यांच्यातील संयुक्त लष्करी सराव, AFINDEX-23 चा पुण्यात समारोप

Devendra Fadnavis On Girish Bapat | जमिनीशी नाळ असलेले राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपले! खा. गिरीश बापट यांना देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

MP Girish Bapat Passed Away | भाजप खासदार गिरीश बापटांच्या निधनानं राष्ट्रवादीच्या नेत्याला अश्रू अनावर, सांगितल्या जुन्या आठवणी