MP Imtiaz Jalil | ‘अमित शाह, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडमवीसांनी 13 लोकांची हत्या केली’, खा. इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) नुकताच आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ (Maharashtra Bhushan Award) दिला. या पुरस्कार सोहळ्याला लाखो श्री सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी लोकांना भरउन्हात तब्बल तीन तास बसावं लागलं. यामध्ये 13 लोकांचा उष्माघाताने (Heatstroke) मृत्यू (Death) झाला. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या तिघांनी 13 लोकांची हत्या केली, असं इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) म्हणाले.

 

खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांनी सरकारच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित केले. जलील म्हणाले की, यापूर्वी महाराष्ट्र भूषण हा कार्य़क्रम कधी ओपन ग्राउंडवर झाला होता का? इतक्या लाखोंच्या संख्येने लोकांना कार्य़क्रमाला बोलावण्याचं कारण का? यापूर्वी कधी इतक्या संख्येने लोकांना बोलवलं होतं का? मला अशी माहिती मिळाली की, या कार्य़क्रमावर सरकारने 14 कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, या कार्यक्रमाचं आयोजन करताना तिथल्या तापमानाची, हवामानाची माहिती तुम्ही घेतली नव्हती का? असे प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केले आहेत.

 

5 लाख रुपये देऊन विषय संपवण्याचा प्रयत्न केला
जलील पुढे म्हणाले, सरकारने मृतांच्या कुटुंबांना पाच लाख रुपये देऊन विषय संपवण्याचा प्रयत्न केला खरा. तरी देखील तो विषय संपला नाही म्हणून अजित दादा कुठे चालले आहेत अशा आशयाच्या या बातम्या पसरवल्या. अजित पवार (Ajit Pawar) कधी जाणार, कुठे जाणार, किती लोकांना सोबत घेऊन जाणार? अजित पवार राष्ट्रवादी (NCP) सोडणार या बातम्या पसरवल्या. मात्र, यामुळे 13 लोकांच्या मृत्यूचा विषय बाजूला राहिला. सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे 13 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला पाहिजे.

 

हा बळी नाही तर हत्या झाली
महाराष्ट्र भूषण कार्य़क्रमात स्वत:ला घाम येऊ नये म्हणून तुम्ही (अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस) शेडमध्ये बसले होते.
पण लाखोंच्या संख्येनं कार्यक्रमाला आलेल्या गोर-गरीब अनुयायांना तुम्ही उन्हात बसवलं.
यामध्ये 13 लोकांचा बळी गेला, हा बळी नाही तर हत्या झाली आहे. अमित शहा, एकनाथ शिंदे,
देवेंद्र फडणवीस यांनी ही हत्या केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला.

 

50 लाख रुपये मदत करा
सत्ताधाऱ्यांनी आपली जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली. तुम्ही गरीब लोक आहात,
तुम्ही मेलात तर काय फरक पडणार नाही. आम्ही तुम्हाला सरकारी तिजोरीतून पाच लाख रुपये देतो.
पण तुम्हाला लाज वाटायला हवी, 50 लाख रुपये मदत करा, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली.

 

 

Web Title :- MP Imtiaz Jalil | ‘Amit Shah, Eknath Shinde and Devendra Fadamvis killed 13 people’, Kha. Serious allegations of Imtiaz Jalil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘अजित पवारांचं वक्तव्य हे फूलस्टॉप नसून कॉमा, अजूनही काहीही होऊ शकतं’

MahaDBT | ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन

Maharashtra Political News | अजित पवारांनी संजय राऊतांना का सुनावलं?, संजय शिरसाटांनी सांगितले कारण, म्हणाले…