MP Imtiaz Jalil | गिरीश महाजनांच्या आरोपांवर इम्तियाज जलील भडकले, म्हणाले-‘मला वाटायचं गिरीश महाजनांना थोडी अक्कल…’

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – संभाजीनगर मधील किराडपुरा भागात रामनवमीच्या (Ram Navami) आदल्या दिवशी दंगल झाली. समाजकंटकांनी पोलिसांच्या वाहनांसह खासगी गाड्यांवर दगडफेक करत जाळपोळ (Chhatrapati Sambhaji Nagar Incident) केली. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला. या घटनेला खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) असल्याचा आरोप भाजप नेते गिरीश महाजन (BJP Leader Girish Mahajan) यांनी केला आहे. महाजन यांच्या आरोपांवर इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले महाजन?

संभाजीनगर मध्ये जे घडले त्याला इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांनी नुकतेच केलेले 15 दिवसांचे आंदोलन कारणीभूत आहे. त्यामुळेच तिथली परिस्थिती बिघडली आहे. जलील यांच्या आंदोलनादरम्यान अनेक आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आली. त्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला. त्यांच्या आरोपांना जलील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उत्तर दिले आहे.

काय म्हणाले इम्तियाज जलील?

इम्तियाज जलील म्हणाले, मला आधी वाटायचं गिरीश महाजन उच्च शिक्षित आहेत. त्यांना थोडी अक्कल असेल, पण तसं नाही.
मी 14 दिवस लोकशाही मार्गाने आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आम्ही ठिय्या मांडून बसलो. कँडल मार्च काढला.
एक मोठं आंदोलन विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर केलं. एकूण तीन आंदोलनं केली तरी कुठेही कोणाताही अनुचित प्रकार घडला नाही.

जलील पुढे म्हणाले, आमच्या आंदोलनावेळी कुठेही हेट स्पीच ऐकायला मिळाले नाही.
तरी देखील माझ्यासह 29 जण आणि इतर 1500 अनोळखी लोकांविरोधात गुन्हे दाखल केले.

Web Title :- MP Imtiaz Jalil | imtiaz jaleel says girish mahajan had no common sense chhatrapati sambhaji nagar riots

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune PMC – Mahavitaran – MahaPreit | महापालिका आणि महाप्रीतच्या व्यवहारात मोठी आर्थिक अनियमीतता ! वीज पुरवठा दरात महापालिकेची फसवणूक झाल्याचा संशय

Belly Fat | पोटाची चरबी कमी करायची असेल तर करू नका ‘ही’ गोष्ट; जाणून घ्या

Pune Crime News | 50 हजारांवर अडीच लाख परत केल्यानंतरही 55 हजारांची मागणी करुन धमकाविणार्‍या सावकारावर गुन्हा दाखल, चंदननगर पोलीस ठाण्यात FIR

Maharashtra Politics News | निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवारांनी प्रयत्न केले, शिंदे गटाच्या नेत्या खळबळजनक गौप्यस्फोट